Amitabh-Bachchan 
मनोरंजन

पान मसाल्याची जाहिरात का स्वीकारली? बिग बींनी दिलं चाहत्याला उत्तर

'तुमच्यात आणि इतर कलाकारांमध्ये काय फरक राहिला?'

स्वाती वेमूल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन Amitabh Bachchan सध्या त्यांच्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी पान मसाल्याची paan masala जाहिरात केल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली. बिग बींसारख्या कलाकाराने अशाप्रकारची जाहिरात करावी हे त्यांच्या चाहत्यांना पटलेलं नाही. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आपली नाराजी व्यक्त केली. एका चाहत्याने बिग बींना फेसबुकवर हा जाहिरात का केली, असा प्रश्न विचारला असता, आता पहिल्यांदाच अमिताभ बच्चन यांनी त्यावर उत्तर दिलं आहे. याआधी रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान यांनीसुद्धा पान मसाल्याच्या विविध ब्रँडसाठी जाहिराती केल्या आहेत.

चाहत्याचा सवाल-

प्रणाम सर, मला फक्त तुम्हाला एकच गोष्ट विचारायची आहे. पान मसाल्याची जाहिरात करायची तुम्हाला काय गरज आहे? मग तुमच्यात आणि इतर कलाकारांमध्ये काय फरक राहिला?, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना फेसबुकद्वारे विचारला.

बिग बींचं उत्तर-

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना बिग बी यांनी लिहिलं, 'मान्यवर, मला माफ करा, कोणत्याही व्यवसायात जर एखाद्याचं भलं होत असेल, तर आपण त्या व्यवसायाशी का जोडलो गेलो याचा विचार केला नाही पाहिजे. होय, जर व्यवसाय असेल तर त्यात स्वत:च्या व्यवसायाचाही विचार करावा लागतो. आता तुम्हाला असं वाटत आहे की मला ही जाहिरात करायला पाहिजे नव्हती. मात्र ही जाहिरात केल्याने, मला त्यासाठी पैसेही दिले गेले पण आमच्या व्यवसायात काम करणारे बरेच लोक आहेत.'

जाहिरातीवरून टीका

सोशल मीडियावरुन अमिताभ यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. तुम्ही या उत्पादनाची जाहिरात का करत आहात असा प्रश्न चाहत्यांनी त्यांना विचारला आहे. एका युझरनं त्यांच्यावर टीका करताना म्हटले की, बिग बी तुमच्याकडून अशाप्रकारचं कृत्य अपेक्षित नव्हतं. तुम्ही कोट्यवधी लोकांसाठी प्रेरणास्थान आहात. अशावेळी तुम्ही पान मसाल्याच्या जाहिराती करणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यानं विचारला आहे. तुम्ही अशा प्रकारची जाहिरात केल्यानं समाजात चुकीचा संदेश जातो आहे असे तुम्हाला वाटत नाही का, असंही त्याने म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भयंकर! ४८७ हून अधिक पुरुषांसोबत शरीरसंबंधासाठी दबाव, सिगारेटचे चटके, मारहाण अन्... प्रियकराचं प्रेयसीसोबत पाशवी कृत्य

Latest Marathi News Live Update : राजकारणापासून ते गुन्हेगारीपर्यंत देशात आज काय-काय घडलं? एका क्लिकवर जाणून घ्या प्रत्येक अपडेट

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीचे वादळ पाहून काव्या मारनच्या चेहऱ्याचा रंग उडालेला... Boss Baby बाद होताच कशी होती तिची रिअ‍ॅक्शन ते पाहा... Video Viral

Koregaon Park Raid : पुण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! वेश्याव्यवसाय करणाऱ्या केनियाच्या 4 तरुणींची सुटका; कोरेगाव पार्क हादरलं

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT