amitabh bachchan, amitabh bachchan injury, projekt K SAKAL
मनोरंजन

हैद्राबाद मध्ये शूटिंगदरम्यान Amitabh Bachchan यांना गंभीर दुखापत, तत्काळ मुंबईत रवाना

अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत

Devendra Jadhav

Amitabh Bachchan News: अमिताभ बच्चन सध्या त्यांच्या आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या आगामी 'प्रोजेक्ट के' (Projekt K) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हैदराबादमध्ये जखमी झाले.

अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर त्याचे हेल्थ अपडेट शेअर केले आणि सांगितले की ते सध्या त्यांच्या मुंबईतील घरी विश्रांती घेत आहे.

(Amitabh Bachchan seriously injured while shooting in Hyderabad, immediately left for Mumbai)

एका अ‍ॅक्शन सीक्‍वेन्समध्ये अमिताभ जखमी झाले असून त्यांच्या उजव्या बरगडीचे स्नायू फाटले आहेत.

बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर अपडेट शेअर केले आणि सांगितले की, दुखापत झाल्यामुळे त्यांना शूट रद्द करावे लागले. आता दुखापतीतून बरे होण्यासाठी त्यांना काही आठवडे लागणार आहेत.

दुखापतीनंतर, अमिताभ यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि हैदराबादमधील एआयजी हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅन केले आणि घरी परतले. दुखापत बरी होण्यासाठी किमान काही आठवडे लागतील म्हणून डॉक्टरांनी त्याला विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

अमिताभ लिहितात.. "श्वास घेताना आणि हालचाल करताना वेदना होत आहेत, सुपरस्टारने कबूल केले की वेदना कमी करण्यासाठी ते औषधे घेत आहेत. त्यामुळे शूटिंग सध्या रद्द करावे लागत आहे. मी काही दिवस मोबाईलवर उपलब्ध असतील परंतु संपूर्णतः बेड रेस्टवर आहे."

अमिताभ यांचे फॅन्स दर रविवारी त्यांचं घर जलसा बाहेर त्यांना भेटायला येत असतात. त्यामुळे रविवारी जलसा बाहेर कोणीही भेटायला येऊ नये असं अमिताभ यांनी त्यांच्या फॅन्सना आवाहन केलं आहे.

अमिताभ बच्चन, प्रभास आणि दीपिका पदुकोण अभिनीत पॅन-इंडिया सायन्स-फिक्शन चित्रपट असलेला प्रोजेक्ट के हा सिनेमा 12 जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून दीपिका पदुकोणचे साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT