Amitabh Bachchan share fan experience in KBC 14,strange fan ecounter Google
मनोरंजन

KBC 14: विचित्र चाहत्याच्या तावडीत सापडलेले अमिताभ, मग जे घडलं ते बिग बीं कडूनच ऐका

सध्या 'केबीसी १४' शो मध्ये स्पर्धकांपेक्षा अमिताभ यांनी स्वतःविषयी केलेले खुलासेच जास्त गाजताना दिसत आहेत.

प्रणाली मोरे

Amitabh Bachchan in KBC 14: कौन बनेगा करोडपती हा एक असा रिअॅलिटी शो आहे,ज्याला संपूर्ण कुटुंब एकत्र बसून एन्जॉय करू शकतो. शो चे सूत्रसंचालक अमिताभ बच्चन आहेत आणि ते स्पर्धकांसोबत रोज हा खेळ रंगवताना जे काही खुलासे करत सुटलेयत स्वतःविषयी, ते शो चा टीआपी वाढवायला मोठी मदत करताना दिसतायत.

काही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी खुलासा केला होता की,जेव्हापण त्यांची नात रागात असते तेव्हा ते तिला गुलाबी रंगाता हेअर बॅंड आणि हेअर क्लिप गिफ्ट म्हणून देतात. बिग बी आपला गेम शो 'कौन बनेगा करोडपती १४' मध्ये आपल्या नातीविषयी बोलत होते. ते त्या प्रश्नाचं उत्तर देत होते जो त्यांना स्पर्धकानं विचारला होता. तेव्हा अमिताभ यांनी आपल्या एका एन्काउंटरविषयी सांगितलं जो त्यांच्या एका विचित्र चाहत्यानं केला होता.

जेव्हा अमिताभ यांनी 'केबीसी १४' च्या चाहत्यांना सांगितलं की, स्पर्धक असलेली वैष्णवी एक पत्रकार आहे, आणि तिला माझी मुलाखत घ्यायची इच्छा आहे. तेव्हा वैष्णवीनं पहिला प्रश्न अमिताभना केला,'बिझी शूटिंग शेड्युलमधून वेळ काढत तुम्ही नातीसोबत वेळ कसा घालवता?' तेव्हा अमिताभ म्हणाले,''मी तिच्यासोबत जास्त वेळ नाही घालवू शकत हे खरं आहे. मी सकाळी ७ किंवा ७.३० ला घरातून बाहेर पडतो. आणि ती जवळपास ८ वाजता शाळेत जायला निघते. ती ३-४ वाजता घरी येते आणि मग तिचा अभ्यास,बाकीच्या अॅक्टिव्हिटीजमध्ये ती बिझी असते. तिची आई ऐश्वर्या तिला त्या कामात मदत करते. मी रात्री जवळपास १०-११ वाजता घरी येतो. आणि तोपर्यंत ती झोपलेली असते''.

ते पुढे म्हणाले, ''मी आजच्या तांत्रिक विश्वाचे आभार मानतो. आम्ही दोघं व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट असतो. एक फक्त रविवार असतो जेव्हा फ्री टाईम मिळतो तिला आणि तेव्हा मी देखील फ्री असेन तर तिच्यासोबत काही वेळ खेळतो. जेव्हा ती माझ्यावर नाराज असते तेव्हा मी तिला चॉकलेट गिफ्ट देतो. नाहीतर मग तिच्या आवडत्या गुलाबी रंगाचा हेअरबॅंड तिला गिफ्ट करतो. तेव्हा ती खुश होते''.

स्पर्धकानं पुढे अमिताभ यांना त्यांच्यासोबत झालेल्या विचित्र फॅन काऊंटर विषयी देखील सांगायला सांगितलं. तेव्हा बिग बी म्हणाले,''हे ऐकून खूप अजीब वाटेल पण प्रत्येक चाहता आपल्या लाडक्या अभिनेत्यासाठी वेडा असतो. आम्ही एकदा कोलकाता मध्ये बोटॅनिकल गार्डन जवळ एका तलावापाशी शूटिंग करत होतो. आम्हाला तो तलाव पार करायचा होता,त्याच्या दुसऱ्या काठावर २० ते ३० लोक उभे होते''.

अमिताभ पुढे म्हणाले,''आम्ही एका होडीत बसून पलिकडे जाणार होतो इतक्यात मी समोरच्या काठावर एका माणसाच्या हातातला कागद आमच्या दिशेने हलवताना पाहिले. तो ओरडत होता,'एक ऑटोग्राफ प्लीज...'. मी त्याला देतो म्हणत हात वर केला. पण त्या पठ्ठ्यानं काहीही समजून न घेता थेट कागद-पेन तोंडात पकडून तलावात उडी मारत आमच्या दिशेने पोहू लागला. मी त्याची गळाभेट घेतली खरी,पण मी देखील त्यामुळे भिजलो. जेव्हा मी त्याला ऑटोग्राफ दिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला हवा होता. पण त्यानंतर त्यानं पुन्हा पलीकडे जायला तलावात उडी मारली आणि कागदासोबत मी दिलेला ऑटोग्राफही मार्गी लागला... म्हणजे मिटून गेला''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या! पुणे, मुंबईसह आज राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीची धूम

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ६ सप्टेंबर २०२५ ते १२ सप्टेंबर २०२५ - मराठी राशी भविष्य

अग्रलेख : तंत्रज्ञानाचे ‘विक्रम’ संवत!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 6 सप्टेंबर 2025

हौस ऑफ बांबू : पुस्तकं, गप्पा आणि मॅजेस्टिक अशोकराव...!

SCROLL FOR NEXT