prabhas big b 
मनोरंजन

'बाहुबली' प्रभासच्या सिनेमात महानायक अमिताभ यांची एंट्री, प्रभासने दिली प्रतिक्रिया

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- दिग्दर्शक नाग अश्विन यांच्या सिनेमात प्रभास आणि दीपिका पदूकोणसोबत आता महानायक अमिताभ देखील दिसून येणार आहेत. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.  

तरण आदर्श यांनी लिहिलं, अमिताभ, प्रभास, दीपिका #prabhas21 (अजुनपर्यंत शिर्षक दिलं गेलं नाही) अमिताभ बच्चन देखील असतील. नाग अश्विन हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत. Vyjayanthi moviews द्वारे या सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. २०२२ मध्ये हा सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. यासोबतंच तरण आदर्श यांनी एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये लिहिलंय, दिग्गजाशिवाय आम्ही एक दिग्गज सिनेमा बनवण्याचा विचार तरी कसा करु शकतो. नाग अश्विन यांच्या सिनेमात आता अमिताभ बच्चन जोडले गेले असल्याने या सिनेमाची तगडी स्टारकास्ट तयार झाली आहे. बाहुबली फेम अभिनेता प्रभासने हा व्हिडिओ शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

त्याने लिहिलंय, 'अखेर स्वप्न सत्यात उतरतंय. लीजेंडरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे. #NamskaramBigB'  अमिताभ यांच्या कामाबाबत बोलायचं झालं तर त्यांच्याकडे खूप प्रोजेक्ट आहेत. अमिताभ अयान मुखर्जी यांच्या 'ब्रह्मास्त्र'मध्ये देखील दिसणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबत रणबीर आणि आलिया देखील आहेत. यासोबतंच नागराज मंजुळे यांच्या 'झुंड' या सिनेमात देखील ते आहेत. या सिनेमाचा फर्स्ट लूक आधीच रिलीज झाला आहे.यात इमरान हाश्मी देखील आहे.   

amitabh bachchan to star in prabhas 21 deepika padukone nag ashwin film  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT