Amitabh Bachchan's co-star Apoorva Shukla passed away at the age of 35 SAKAL
मनोरंजन

Apoorva Shukla Death: अमिताभ बच्चन यांच्या सहकलाकाराचं ३५ व्या वर्षी निधन, समोर आलं धक्कादायक कारण

अमिताभ - अजय यांच्यासोबत काम केलेल्या अभिनेत्याचं दुःखद निधन झालंय

Devendra Jadhav

Apoorva Shukla Death News: सिनेजगतातून आज सकाळी प्रसिद्ध कलाकार बोंडा मणी यांचं निधन झाल्याची एक दु:खद बातमी समोर आली आहे. आता मनोरंजन विश्वातून आणखी एक दुःखद वार्ता समोर येतेय.

अमिताभ बच्चन - अजय देवगण यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलेला प्रसिद्ध अभिनेता अपूर्व शुक्ला यांचं निधन झालं. अपूर्व अवघ्या ३५ वर्षांचा होता. अपूर्वच्या निधनाचं कारण समोर आलंय.

३५ व्या वर्षी अपूर्वचं निधन

अभिनेता अपूर्व शुक्ला यांचे निधन झाले आहे. अपूर्वने बुधवारी भोपाळमधील हमीदिया रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ३५ वर्षीय अपूर्व हा गेल्या काही काळापासून नैराश्याने त्रस्त होता आणि त्याच्यावर उपचारही सुरू होते.

चित्रपटांव्यतिरिक्त अपूर्व शुक्लाने टीव्ही शोमध्येही काम केले आहे. अपूर्व पत्रकारितेच्या जगातही सक्रिय होता.

डिप्रेशनच्या कारणाने अपूर्वचं निधन

न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, वडिलांच्या निधनानंतर अपूर्व हळूहळू डिप्रेशनमध्ये जाऊ लागला. अपूर्वा आधी वडील पंकज शुक्ला आणि आई इंदिरा शुक्ला यांच्यासोबत जहांगीराबादच्या अहिर मोहल्लामध्ये राहत होता.

नंतर त्याने घर सोडले आणि तो एका धर्मशाळेत राहत होता. अहवालात म्हटले आहे की, बुधवारी पोलिसांना धर्मशाळेत व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. ओळख पटल्यानंतर तो अपूर्व शुक्ला असल्याचे समजले.

अपूर्व शुक्लाची कारकीर्द

अपूर्व शुक्लाच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर त्याने चित्रपटांसोबतच काही टीव्ही शोमध्ये काम केले होते. अपूर्व शुक्लाने अमिताभ बच्चन आणि अजय देवगण यांच्या चित्रपटात काम केले होते.

'चक्रव्यूह', 'सत्याग्रह', 'गंगाजल' आणि 'तबला' यासारख्या काही चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच तो झीटीव्ही आणि सोनीच्या काही मालिकांमध्ये दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil Jitendra Awhad Eknath Shinde : जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड रात्रीतून एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंद दाराआड ४५ मिनीटांच्या भेटीत नेमकं काय घडलं?

Tamil Nadu CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांचा अनोखा निर्णय! जन्मलेल्या प्रत्येक बाळाला मिळणार सोन्याची अंगठी; 'मामा'ची अनोखी भेट

Maharashtra News: मुख्यमंत्र्यांच्या परस्पर भेटीवरून नाराजी? सुनेत्रा पवारांकडून विचारणा; तटकरे यांचा इन्कार

Pune Rain: पुणेकरांना दिलासा! आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन; पुढील २-३ दिवस हलक्या सरींचा अंदाज

Miraj Assembly Constituency : 'मिरज मतदारसंघ खुला झाला तरी मी निवडणूक लढवणारच'; आमदार खाडेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, राजकीय समीकरणे बदलणार?

SCROLL FOR NEXT