Amitabh Bachchan Sakal
मनोरंजन

Amitabh Bachchan: ट्विटरवर अमिताभ बच्चन यांनी केली चूक, माफी मागूनही...

पण आता अमिताभ बच्चन यांनी एक मोठी चूक केली आहे, ज्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. पण आता अमिताभ बच्चन यांनी एक मोठी चूक केली आहे, ज्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. बिग बींनी माफी मागितल्यानंतर काही लोक त्यांना मजेशीर पद्धतीने उत्तर देत आहेत, त्यानंतर चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये त्यांनी काही चूक केली होती. जेव्हा बिग बींना त्यांची चूक समजली तेव्हा त्यांनी शनिवारी रात्री उशिरा केलेल्या ट्विटमध्ये माफी मागितली. बिग बींनी माफी मागितली आणि लिहिले, 'T4515 मोठी चूक, T 4514 नंतर माझे पूर्वीचे सर्व ट्विट चुकले आहेत. T 5424,5425,5426,4527, 5428, 5429, 5430.. सर्व चुकीचे आहेत.. ते T4515,4516,4517,4518,4519 4520,452 असायला हवे होते. क्षमा.'

अभिनेत्याच्या या ट्विटवर चाहतेही कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले, 'सर स्पष्टीकरणासाठी धन्यवाद. दुसरा म्हणाला, 'सर हे दाखवल्याबद्दल धन्यवाद. मला झोप येत नव्हती'. दरम्यान, अमिताभ यांच्या पोस्टमधील 'माफी'चे स्पेलिंग चुकीचे असल्याबद्दल एका यूजरने गंमतीत म्हटले की, "सर माफीचे स्पेलिंग चुकीचे आहे, कृपया T4516 मध्ये ते दुरुस्त करा."

अमिताभ बच्चन नुकतेच 'ऊंचाई' आणि 'गुडबाय' चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नसला तरी. त्याचबरोबर तो लवकरच 'आदिपुरुष'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्याचवेळी अमिताभ बच्चन प्रभास आणि दीपिका पदुकोणसोबत 'प्रोजेक्ट के'मध्येही दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT