Amitabh Bachchan,Mithun Chakraborty Google
मनोरंजन

मिथुनची 'कृष्णन अय्यर' नाही तर 'ही' भूमिका माझी फेव्हरेट

अमिताभ बच्चन यांनी 'अग्निपथ' सेटवरील फोटो शेअर करीत बोलून दाखवली मनातली गोष्ट

प्रणाली मोरे

अमिताभ बच्चन हा बॉलीवूडला लाभलेला असा महानायक आहे की ज्यांनी स्वत: एकापेक्षा एक दर्जेदार सिनेमे केले आहेत. पण असा दिग्गज अभिनेता जेव्हा आपल्या एखाद्या सहकलाकाराची फिल्म किंवा भूमिका आपली फेव्हरेट आहे असं बोलतो तेव्हा त्या समोरच्या कलाकाराचं भाग्यच उजळलं म्हणायचं. अमिताभ यांनी आपल्या कारकिर्दीत आपल्या मागून इंडस्ट्रीत पदार्पण केलेल्या अनेक कलाकारांसोबत तितक्याच तन्मयतेनं काम केलं. ब-याचदा ते आपल्या या सहकलाकरांच्या कामाचं कौतूकही सोशल मीडियावरनं करताना दिसतात. आज मिथुन चक्रवर्तीं सोबतचा फोटो शेअर करीत अमिताभ यांनी काही आठवणींना उजाळा दिला.

अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांनी एकत्र 'दो अंजाने','गंगा जमुना सरस्वती' आणि 'अग्निपथ' अशा सिनेमांतून काम केलेले आहे. त्या सिनेमांतील या दोघांची केमिस्ट्री सुद्धा उत्तम जमून आलेली. दोघांमध्ये चांगली मैत्रीही झालेली. या दोघांनी एकत्र काम केलेला अग्निपथ सिनेमा हा सुपरहिट ठरलेला. त्यातील अमिताभ यांनी साकारलेली 'विजय दिनानाथ चौहान' ही व्यक्तीरेखा आजही तितकीच स्मरणीय तर मिथुन यांची 'कृष्णन अय्यर एम ए' ही व्यक्तीरेखाही तेव्हा भाव खाऊन गेलेली.

आज अमिताभ यांनी 'अग्निपथ' सिनेमाच्या सेटवरील एक जुना फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन,मिथुन चक्रवर्ती आणि किशोर वयीन अभिषेक बच्चनही दिसत आहे. या फोटोपेक्षाही अधिक त्याला अमिताभ यांनी दिलेलं कॅप्शन आपलं लक्ष वेधून घेत आहे. अमिताभ यांनी या फोटोला कॅप्शन दिलंय की,'विजय दिनानाथ चौहान,बॉब बिस्वास आणि डिस्को डान्सर'. त्यामुळेच फॅन्सनी कमेंट करताना लिहीलंय की,'अग्निपथच्या सेटवर जिम्मीची आठवण'. या फोटोच्या निमित्तानं अमिताभ यांनी अभिषेकच्या नुकत्याच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या 'बॉब बिस्वास' या फिल्मचंही नकळत प्रमोशन केलंय म्हणायचं. अभिषेकच्या या सिनेमाला मिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. हा सिनेमा विद्या बालनच्या कहानी या सिनेमापासनं प्रेरित आहे. या सिनेमातील भूमिकेसाठी अभिषेकनं आपलं वजन जवळपास १२० किलोपर्यंत वाढवलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT