amruta anmol 
मनोरंजन

अमृता राव आणि आरजे अनमोलने बाळाची झलक दाखवत केली नावाची घोषणा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आई बनल्यानंतर अमृता आणि अनमोलवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चाहत्यांना त्यांच्या या चिमुकल्याची एक झलक पाहण्याची उत्सुकता आहे. सोशल मिडियावर चाहते त्याच नाव ऐकण्यासाठी देखील आसुसले आहेत.

अमृता आणि अनमोलने त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याचा पूर्ण फोटो नसला तरी या दोघांच्या हातात चिमुकला हात दिसून येत आहे. अनमोलने पोस्ट केलेला हा फोटो अमृताने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. यासोबतंच दोघांची त्याच्या नावाची देखील घोषणा केली आहे. 

अनमोलने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'आमचा मुलगा वीर कडून तुम्हाला सर्वांना हाय. तो तुमच्याकडून सध्या त्याचा ब्रो फर्स्ट लूक पाहत आहे. तुमचा आशिर्वाद असाच असू द्या.' एक नोव्हेंबरला अमृता रावने मुलाला जन्म दिला. चिमुकल्या पाहुण्याच्या आगमनाने घरात आनंदाचं वातावरण आहे. वडिल बनल्यामुळे आर जे अनमोलचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

लग्नाच्या चार वर्षांनंतर अमृताच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. अभिनेत्री अमृता रावने ती प्रेग्नंट असल्याची गोष्ट अनेक दिवस लपवून ठेवली होती. नवव्या महिन्यात तीने सोशल मिडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी दिली. अमृताने ही गोष्ट लपवल्याने चाहत्यांची माफी देखील मागितली होती.   

amrita rao and rj anmol introduce their son veer shares photos  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Children Hostage: रोहित आर्यने खिडक्यांना सेन्सर का लावले होते? पोलिसांनी त्याला कसा चकमा दिला?

Rohit Arya : निधी मिळण्यासाठी रोहित आर्यने पुण्यात केले होते उपोषण

India vs Pakistan अन् मोहसिन नक्वी पुन्हा 'राडा'! पुढील महिन्यात Asia Cup मध्ये हायव्होल्टेज सामना; जाणून घ्या डिटेल्स

Georai News : गेवराईतील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा नळ योजना अपुर्णच

Prakash Ambedkar : येत्या ३ महिन्यांत भारत-पाक युद्ध! वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांची टिका

SCROLL FOR NEXT