amrita rao,cristiano ronaldo file image
मनोरंजन

रोनाल्डोच्या 'कोका कोला' प्रकरणावर अमृता म्हणे...

पत्रकार परिषदेमध्ये रोनाल्डोने टेबलावर ठेवलेल्या दोन कोका कोलाच्या बाटल्या बाजूला ठेवल्या. त्याने टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली हातात घेतली.

प्रियांका कुलकर्णी

प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो(amrita rao) युरो स्पर्धेतील पहिल्या मॅचपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एका घटनेमुळे चर्चेत आला. हंगेरीविरोधात मॅचच्या आधीच्या पत्रकार परिषदेमध्ये रोनाल्डोने टेबलावर ठेवलेल्या दोन कोका कोलाच्या बाटल्या बाजूला ठेवला त्यानंतर त्याने टेबलावर ठेवलेली पाण्याची बाटली हातात घेतली. या घटनेवर अभिनेत्री अमृता रावच्या (amrita rao) 'विवाह' या चित्रपटामधील एका सिनचे मिम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मिममध्ये अमृताने हातात पाण्याचा ग्लास घेतलेला दिसत आहे.(amrita rao reacts to cristiano ronaldo made jal lijiye meme viral on social media)

विवाह चित्रपटातील आमृताचा 'जल लिजिए' या डायलॉगचे रोनाल्डोच्या कोका कोला प्रकरणावरून मिम तयार केले आहे. ते मिम अमृताने सोशल मीडियावर शेअर केले. अमृताने त्याला कॅप्शन दिले, 'Wat'er Are U Saying' अशी मजेदार कॅप्शन दिले आहे.नेटकऱ्यांनी या मिमला पसंती दिली आहे. अमृताच्या या पोस्टला काही तासांमध्ये 15 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. विवाह हा चित्रपट 2006 साली प्रदर्शित झाला या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि अमृताने प्रमुख भूमिका साकारली होता.

काय आहे रोनाल्डोचे कोका कोला प्रकरण?

पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यातील सामन्यापूर्वी घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्सवेळी रोनाल्डोनं समोर ठेवलेल्या कोका कोला ब्रँडच्या दोन बाटल्या बाजूला सरकावल्या. त्यानंतर त्याने पाण्याची बाटली दाखवली. 36 वर्षीय रोनाल्डो स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी कसल्याही प्रकारच्या कोल्ड ड्रिंक्सपासून दूर राहतो. हंगेरीविरोधात मॅचच्या आधी रोनाल्डो आणि पोर्तुगालचे कोच फर्नांडो सांतोस पत्रकार परिषदेसाठी आले, तेव्हा दोन कोका कोला बॉटल्स टेबलावर ठेवण्यात आल्या होत्या. रोनाल्डोने त्या पाहिल्यानंतर त्यांना तत्काळ तेथून बाजूला केलं. शिवाय पाण्याची बॉटल हातात घेत पोर्तुगिजमध्ये ‘Agua!’ असं म्हटलं. रोनाल्डोच्या या कृतीमुळे कोका कोला कंपनीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: 'कोलकाता कसोटीच्या चार दिवसांपूर्वी BCCI चे क्युरेटर आले आणि...', सौरव गांगुलीचा खुलासा

अजितदादा माफ करा, पदरात घ्या; लेकाने बोट दाखवून चॅलेंज दिल्यानंतर राजन पाटलांची माफी

Mumbai Metro: मुंबई मेट्रोमधून थेट बुलेट ट्रेन आणि रेसकोर्सला जोडणी; दोन नवे सबवे उभारण्याची तयारी, कुठे आणि कधी? जाणून घ्या...

Wagholi Accident : वाघोलीत थांबलेल्या ट्रकला धडक; सेफ्टी लाइट नसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार!

Latest Marathi Breaking News Live Update : पाणी भरण्याच्या वादावरून महिलेने केली शेजाऱ्याची हत्या

SCROLL FOR NEXT