Amrita Rao was first choice for Krrish Google
मनोरंजन

Amrita Rao: 'सगळं जुळून आलं असतं तर अमृता रावचं नशीबच चमकलं असतं..', हृतिकचा 'क्रिश' कसा हातातून निसटला?

अमृता रावनं एका मुलाखतीत क्रिशसाठी राकेश रोशन यांची पहिली पसंती आपल्यालाच होती सांगत सिनेमा हातातून जाण्यामागच्य़ा कारणाचा खुलासा देखील केला आहे.

प्रणाली मोरे

Amrita Rao: बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि हृतिक रोशन यांचा ब्लॉकबस्टर सिनेमा 'क्रिश' सर्वांचीच पसंती मिळवून गेला होता. सिनेमाची कहाणी आणि सुपरहिरो अॅक्शननं तेव्हा नुसता धुमाकूळ घातला होता.

सिनेमातील हृतिक आणि प्रियंकाची केमिस्ट्री भलतीच लोकांना आवडली होती. पण तुम्हाला माहित आहे का..खरंतर प्रियंका ही राकेश रोशनची पहिली पसंती नव्हतीच मुळी. राकेश रोशन यांची नजर होती ती 'मैं हूं ना' स्टार अमृता राव हिच्यावर. (Amrita Rao was first choice for Krrish, not Priyanka Chopra)

'क्रिश' सिनेमा संदर्भात अमृता आणि हृतिकच्या एकत्रित फोटोशूटची चर्चा तेव्हा सुरू झाली होती. पण दोघांमधली केमिस्ट्री सपशेल फेल ठरली ...फोटोशूट दरम्यान दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जरादेखील दिसली नाही. आणि मग यामुळे अमृताला त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडावं लागलं.

अमृतानं २००६ मध्ये एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की,''हृतिक आणि मी क्रिशसाठी फोटोशूट केलं होतं. पण आमच्यात खूप वाईट केमिस्ट्री दिसून आली. मी त्याच्यासमोर खूपच छोटी दिसत होते. सिनेमा हातातून गेला याचं मला मुळीच दुःख नाही,कारण तो ज्याच्या नशीबात असणार त्यालाच मिळणार''.

माहितीसाठी इथं सांगतो की,काही दिवसांपूर्वीच हृतिकनं 'क्रिश ४' पाइपलाइनमध्ये आहे असं सांगत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. लवकरच सिनेमाचं शूटिंगही सुरू होईल असं देखील तो म्हणाला होता. त्याचे चाहते आता सिनेमाविषयी खूपच उत्सुक आहेत.

हृतिक रोशनचे वडील,निर्माता राकेश रोशन दिग्दर्शित 'कोई मिल गया' हा फ्रॅंचायजीचा पहिला सिनेमा होता,जो २००३ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर 'क्रिश' आला २००६ मध्ये, आणि 'क्रिश ३' आला २०१३ मध्ये.

'क्रिश ४' विषयी विचारणा झाल्यावर हृतिक रोशननं एका नव्या मुलाखतीत सांगितलं की, ''मला वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र प्रार्थना करायला हवी सिनेमासाठी. सगळं सेट आहे पण एका तांत्रिक मुद्द्यावर गाडी अडली आहे''.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: ''तुम्ही बंजारा समाजासारखे दिसत नसतानाही आरक्षण का खाल्लं?'', धनंजय मुंडेंना उद्देशून जरांगेंचं मोठं विधान

अडीच वर्षांपूर्वी विवाह, पतीसह सासरच्यांकडून छळ; पोलिसाच्या पत्नीनं तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत संपवलं जीवन, दिरानं रुग्णालयात नेलं, पण...

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Crop Loss: पिकेच झाली उद्‍ध्वस्त, खत देणार कशाला? नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ७० हजार टनांहून अधिक साठा पडून

Layoff 2025: अमेरिकन कंपनीचा धक्कादायक निर्णय; 4 मिनिटांच्या कॉलमध्येच भारतीय कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं

SCROLL FOR NEXT