amrita saif 
मनोरंजन

अमृता सिंहने गायलेलं हे गाणं ऐकल्यावर सैफ झाला होता तिच्यावर फिदा, व्हिडिओच्या शेवटी पाहा काय केलं..

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडच्या काही जोड्या या नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतात. त्यातलीच एक जोडी म्हणजे अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची. अभिनेत्री अमृता सिंह आणि अभिनेता सैफ अली खान यांची रिलेशनशिप बॉलीवूडमधली सगळ्यात वादग्रस्त रिलेशिपपैकी एक राहिली आहे. सैफ आणि अमृता २००४ मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. मात्र त्यांची मुलं सारा आणि इब्राहिमसाठी ते नेहमी एकत्र येतात. अमृताला घटस्फोट दिल्यानंतर सैफने २०१२ मध्ये करिना कपूरसोबत लग्न केलं. मात्र अमृता आणि सैफ यांच्या प्रेमाची एक झलक दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

अमृता आणि सैफ यांच्या लव्हस्टोरीमध्ये अनेक चढउतार पाहायला मिळाले. मात्र त्यांच्या प्रेमाची झलक या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सोशल साईटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ जुना असून एका चॅट शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये अमृता सिंह सैफसाठी गाणं गाताना दिसून येतेय. 'तुम आ गए हो' असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं गाताना अमृता चेह-यावरचे हावभाव पाहून कोणीही सांगेल की ती लाजतेय. सैफ अमृताच्या या गाण्याने तिच्यावर चांगला फिदा झालाय कारण गाणं संपल्यावर त्याने अमृताला प्रेमाने किस केलं. या व्हिडिओमधून कळून येतंय की दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं ते. 

सैफ आणि अमृताची मुलं सारा आणि इब्राहीम इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध स्टार किड्स म्हणून ओळखले जातात. इब्राहिम सोशल मिडियावर चांगलाच ऍक्टीव्ह असतो तर सारा तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकतेय.

सिनेमांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सैफअली खान 'जवानी जानेमन' या सिनेमामध्ये शेवटचा दिसला होता तर अमृता सिंह शेवटची अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू स्टारर 'बदला' या सिनेमात झळकली होती.   

amrita singh singing tum aa gaye ho for saif ali khan and throwback video is viral  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT