Amruta Fadnavis and Riyaz Ali  Sakal
मनोरंजन

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांसोबत रीलवर थिरकणारा रियाज आहे तरी कोण?

अमृता फडणवीस या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत.

सकाळ डिजिटल टीम

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कारणाने सतत चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांचे नुकतेच 'मैने मूड बना लिया है' गाणे रिलीज झाले. हे गाणे सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस या पहिल्यांदाच एका पंजाबी गाण्याच्या निमित्ताने चाहत्यांच्या भेटीला आल्या आहेत. त्याचबरोबर अमृता फडणवीस यांच्या ग्लॅमरस लूकची देखील चर्चा होत आहे.

या दरम्यान अमृता फडणवीस यांचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अमृता फडणवीस यांनी 'मैने मूड बना लिया है' या गाण्यावर त्यांनी रिल स्टारबरोबर चांगलाच ठेका धरला आहे. या रिल स्टारचं नाव रियाझ अली असे आहे. तसेच रियाझ अलीने अमृता फडणवीस यांच्याबरोबरच्या डान्सचा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील शेअर केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा रियाझ अलीने एक फोटोही त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

'आज मै मूड बना लेया', या गाण्यावर हुकअप स्टेप करत त्याचे रिल बनवण्याचे अमृता फडणवीस यांनी चाहत्यांना एक चॅलेंज दिले होते. अमृता फडणवीस यांच्या या गाण्यावर हुकअप स्टेप करत त्याचे रिल बनवण्याचे चॅलेंज दिले होते. त्याचबरोबर या गाण्याचे हॅशटॅग देखील वापरण्यास त्यांनी सांगितले होते. तसेच अमृता फडणवीसांच्या ‘शिव तांडव स्रोतम’, ‘तेरी मेरी फिर से’, ‘बेटिया’, ‘वो तेरे प्यार का गम’ या गाण्याला लोकप्रियता मिळाली होती.

अमृता फडणवीस यांनी रिल रियाझ अली बरोबर बनवला आहे. हा रियाझ अली एक भारतीय रिल स्टार आहे. रियाझ अलीने अवघ्या 18 व्या वर्षातच सोशल मीडियावर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याचा जन्म भूतान येथे झाला आहे. पण रियाझ पश्चिम बंगालमध्ये आला. इन्स्ट्राग्रावर रियाझ अलीचे जवळपास 24 मिलिअन फॉलोअर्स आहेत. तसेच रियाझ रिल स्टारबरोबरच मॉडल आणि फॅशन ब्लॉगरही आहे.

रियाझचे नेटवर्थ जवळपास 80 लाख इतके आहे. टिकटॉक व्हिडीओपासून रियाजने त्याच्या करिअरची सुरुवात केली आहे. रियाजने टिकटॉकवर चांगला प्रतिसाद मिळाल्यावर वयाच्या सोळाव्या वर्षी मुंबईत येऊन करिअरची सुरुवात केली. तसेच टोनी कक्करसोबत देखील काम केले आहे, आणि आतापर्यंत रियाझ अनेक अल्बम साँग्समध्ये मुख्य भूमिकेतही दिसला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

ICC T20 Ranking: अवघ्या वर्षभरात गाठलं शिखर! भारताची श्री चरणी बनली जगातील नंबर-१ टी-२० गोलंदाज; दीप्ती शर्माला मोठा फटका

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT