Mood Banaleya  esakal
मनोरंजन

Mood Banaleya : कोणी काही म्हणा अमृता फडणवीसांच्या गाण्यानं 'मूड बदललाच'! व्ह्युजचा आकडा मोठा, जंगी सेलिब्रेशन

आज मैंने मूड बनालिया है...प्रदर्शित झाले आणि अमृता फडणवीस यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला.

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis Mood Banaleya : अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याची चाहत्यांना, प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. पाच दिवसांपूर्वी त्यांचे मूड बनालिया है नावाचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अमृताजींच्या गाण्याचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

आज मैंने मूड बनालिया है...प्रदर्शित झाले आणि अमृता फडणवीस यांच्यावर नेटकऱ्यांनी कौतूकाचा वर्षाव सुरु केला. काहींनी नेहमीप्रमाणे अमृताजींना त्या गाण्यावरुन ट्रोलही केल्याचेही दिसून आले. त्यांनी ट्रोलर्सलाही सणसणीत उत्तर दिले होते. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी टीका करणाऱ्यांना दिलेले उत्तर चर्चेत आलं आहे.

Also Read - गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

अमृताजी म्हणाल्या होत्या की, मी अभंग जरी म्हटले तरी ज्यांना नावं ठेवायची ते ठेवणारच तेव्हा आपण आपले काम करत राहणे महत्वाचे असे त्या म्हणाल्या होत्या. अवघ्या पाच दिवसांमध्ये अमृताजींच्या त्या गाण्यानं तीस मिलियन व्ह्युजचा टप्पा ओलांडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना अमृता यांनी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सेलिब्रेशन अजुन थांबण्याचे नाव घेत नाही. मुड बनालिया ने तीस मिलियनचा टप्पा पार केला आहे. युट्युब आणि इंस्टाच्या रिल्सवर देखील ते गाणं ट्रेडिंग असल्याचे दिसून आले आहे. याचे श्रेय आमच्या टीमचे आहे. असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT