Amruta Fadnavis New Song Aaj Mein ne Mood Bana Liya Hai :  esakal
मनोरंजन

Amruta Fadnavis New Song : 'अख्ख्या महाराष्ट्राचा मूड बदलवून टाकला!' अमृताजींचे 'मैंने मूड बना लिया' आलं

आपल्या बहारदार गायकीनं साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या आज मैने मूड बना लिया है... हे पंजाबी गाणं प्रदर्शित झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Amruta Fadnavis New Song Aaj Mein ne Mood Bana Liya Hai : आपल्या बहारदार गायकीनं साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमृता फडणवीस यांच्या आज मैने मूड बना लिया है... हे पंजाबी गाणं प्रदर्शित झालं आहे. ते व्हायरल होताच त्यावर मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंटस करणं सुरु केले आहे.

नेटकऱ्यांनी आणि अमृताजींच्या चाहत्यांनी त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या या नव्या गाण्याची चर्चा होती. अमृताजींचे हे पहिलेच पंजाबी गाणे आहे. काल त्याचा ट्रेलर व्हायरल झाला होता. तेव्हापासून त्या गाण्याची चाहत्यांना मोठी उत्सुकता होती. अमृताजींच्या येणाऱ्या प्रत्येक गाण्याची चाहत्यांना ओढ असल्याचे दिसून आले आहे.

Also Read - द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी अमृताजींचे कौतूक केले आहे. पहिल्याच प्रयत्नात खूपच चांगल्या पद्धतीनं त्यांनी पंजाबी गाणे गायले आहे. याशिवाय त्यांच्या डान्सचे देखील तोंडभरून कौतूक केले आहे.

अमृता फडणवीस यांच्या एका ट्वीटमुळे चाहत्यांमध्ये उत्साह आहे. काही पंजाबी ओळींसह अमृता फडणवीसांनी केलेलं हे ट्वीट चाहत्यांची उत्सुकता वाढवत आहे. यापूर्वी त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस यांनी आपल्या नव्या गाण्याची घोषणा केली होती. हे गाणं पंजाबीत आहे. यासोबतच त्यांनी आपला वेस्टर्न ड्रेसमधला एक फोटोही शेअर केला होता.

यु ट्युबवर काही वेळेपूर्वी व्हायरल झालेल्या त्या गाण्यानं आता नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे. त्यामध्ये अमृताजींचा लूक हा नेहमीपेक्षा वेगळा असून तो चाहत्यांना प्रचंड भावला आहे. त्यावरुन अनेकांनी त्यांची स्तुती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT