amruta fadnavis 
मनोरंजन

अमृता फडणवीस यांच्या 'व्हॅलेंटाइन डे' स्पेशल गाण्याची सोशल मीडियावर चर्चा

सकाळ ऑनलाइन

अनोखी गायनशैली आणि राजकीय शेरेबाजीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'व्हॅलेंटाइन डे'निमित्त अमृता यांचं हे खास गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. 'ये नयन डरे डरे' असे या गाण्याचे बोल असून या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत १ लाख ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. 

अमृता फडणवीस यांची आजवर अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचा गाण्याचा अल्बम प्रदर्शित झाला होता. अमृता फडणवीस यांचं गायनावर विशेष प्रेम असून जमेल तितका वेळ त्या गायनासाठी देण्याचा प्रयत्न करतात. 'व्हॅलेंटाइन वीक'मध्ये अमृता यांनी रेड गाऊनमधले फोटो पोस्ट केले होते. त्यांच्या नवीन अल्बमची चर्चा तेव्हापासूनच सुरु झाली होती. अखेर १४ जानेवारी रोजी त्यांचं हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं. 

समुद्र किनाऱ्यावर या गाण्याची शूटिंग झाली असून आशिष पांडा यांनी त्याचं दिग्दर्शन केलं आहे. 'ये नयन डरे डरे हे गाणं मी तुमच्या भेटीला घेऊन येत आहे. हे गाणं रोमँटिक असलं तरी मी माझीच व्हॅलेंटाइन असल्याप्रमाणे एन्जॉय केलंय आणि हा अनुभव खूपच मस्त होता', असं ट्विट करत त्यांनी हे गाणं ट्विटरवर शेअर केलं. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Assembly election results 2026 Update : आसामसह बंगालमध्ये कमळ फुललं, तामिळनाडुत थलपतीचा विजय तर केरळमध्ये पुन्हा काँग्रेस

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Mumbai News: धारावीतील गोंधळ संपणार? अनिर्णित म्हणजे अपात्र नाही, प्राधिकरणाचा स्पष्ट संदेश

Line Fire: सय्यदपुरात महावितरणची मुख्य तार तुटून रस्त्यावर भीषण आग

SCROLL FOR NEXT