amruta khanvilkar dancing at mumbai airport sakal
मनोरंजन

थेट विमानतळावर जाऊन 'चंद्रमुखी' थिरकली.. म्हणाली, काय काय करावं लागतंय..

तिच्या 'चंद्रमुखी'या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता खानविलकर थेट मुंबई एअरपोर्टवर पोहोचली आहे.

नीलेश अडसूळ

Chandramukhi : प्रसाद ओक (prasad oak) दिग्दर्शित 'चंद्रमुखी' या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील गाणीही गाजत आहेत. 'चंद्रा' आणि 'बाई गं' या गाण्याला अक्षरशः प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. या गाण्यांसोबतच चर्चा आहे ती अभिनेत्री अमृता खानविलकरची. या चित्रपटातील चंद्रा म्हणजेच प्रमुख नायिका अमृता खानविलकर आहे. तिच्या नाजूक अदाकारी आणि नृत्याने चाहते घायाळ झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.

या चित्रपटाच्या प्रदर्शनाला केवळ एक दिवस उरलेला असताना 'चंद्रमुखी' म्हणजे अमृता खानविलकर थेट मुंबई विमानतळावर (एअरपोर्ट) पोहोचली आहे. मुंबई विमानतळावर ती आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली आहे. यावेळी घडलेली धमाल तिने व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केली आहे. या व्हिडिओत अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar ) एकत्र दिसत आहे. आदिनाथ कोठारे या चित्रपटात दौलत देशमाने या प्रमुख भूमिकेत आहे.

अमृताने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओत म्हणते, 'चित्रपट तुमच्यापर्यंत पोहोचवायला काय काय करावं लागतंय. आज माही एक धमाकेदार ऍक्टिव्हिटी करणार आहोत. या चित्रपटासाठी आम्ही अडीच वर्षे घाम गाळला, मेहनत घेतली आहे. अजूनही घेत आहोत. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही उद्या २९ एप्रिल रोजी चित्रपट गृहात जाऊन बघा. बघा ना यार..' असं निवेदन तिनं चाहत्यांना केलं आहे. या व्हिडिओत अमृताने लाल रंगाची सुंदर नववारी साडी नेसली आहे.

तर पुढचा व्हिडीओ अत्यंत गमतीशीर आहे. या व्हिडिओत सामान, बॅग वाहून नेण्याच्या ट्रॉलीवर अमृता बसली असून आदिनाथ तिला ट्रॉलीमधूनच एरपोर्टवर फिरवत आहेत. या व्हिडिओला चंद्रा या गाण्याचे संगीत दिले आहे. तर अमृताने 'चंद्रा'च्या मुद्रेत पोज दिली आहे. अमृताच्या या ऍक्टिव्हिटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT