Amruta Khanvilkar will play important role in Malang hindi movie
Amruta Khanvilkar will play important role in Malang hindi movie 
मनोरंजन

'राझी'नंतर आता 'मलंग'मध्ये झळकणार अमृता खानविलकर

सकाळ डिजिटल टीम

अभिनयात उत्तम, डान्समध्ये कमाल आणि सोशल मिडीयावर सुपर ऍक्टिव्ह अशी मराठमोळी अभिनेत्री कोण असं जरी विचारलं तरी क्षणात अनेकांचं अचूक उत्तर असेल ‘अमृता खानविलकर’. मराठी इंडस्ट्रीमध्ये अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची चर्चा बॉलिवूडमध्ये देखील होत असते. अमृताने साकारलेल्या प्रत्येक भूमिका आणि तिचे डायलॉग्स तिच्या चाहत्यांना अगदी तोंडपाठ असतात आणि आता यामध्ये नव्याने भर पडणार आहे कारण अमृताचा नवीन सिनेमा लवकरच येतोय. विशेष म्हणजे ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ नंतर अमृताला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात पाहायला मिळणार आहे.  

मोहित सुरी दिग्दर्शित ‘मलंग’ या सिनेमातील स्टार कास्ट आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी, अनिल कपूर, कुणाल खेमू यांच्यासोबत अमृता खानविलकर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली असून अमृताची ‘मलंग’ झलक पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक असतील यात शंका नाही. 

मराठीसह हिंदी सिनेमांत देखील अमृताने तितक्याच ताकदीने प्रत्येक भूमिका अगदी मनापासून आणि मेहनतीने पडद्यावर साकारल्या आहेत. केवळ सिनेमेच नाही तर हिंदी टेलिव्हिजन, वेबसिरीजसाठी देखील उत्तम काम केले आहे. आतापर्यंत केलेल्या कामाची पावती अमृताला वारंवार तिच्या चाहत्यांच्या प्रतिक्रियांवरुन मिळत राहिल्या आहेत आणि पुढेही मिळतील हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : दुपारी एक वाजेपर्यंत देशात 39.92 टक्के मतदान; महाराष्ट्रात 31.55 टक्के मतदानाची नोंद

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Uber Fake Fare Scam : चालक दाखवतायत खोटं भाडं, ग्राहकांची होतेय लूट.. उबरने दिला सावधान राहण्याचा इशारा!

Latest Marathi News Live Update: ''ही माझी शेवटची निवडणूक आहे'', काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचे वक्तव्य

SCROLL FOR NEXT