amruta 
मनोरंजन

अमृता राव-आर जे अनमोल यांनी लाईव्ह विडिओमधून केले चाहत्याच्या नवजात मुलीचे नामकरण

सकाळ वृत्तसेवा

मुंबई- कोरोना या सांसर्गिक रोगामुळे संपूर्ण जग क्वारंटाईन झालं असून भारतात २१ दिवसाच्या लॉकडाऊनला लोकांना सामोरं जावं लागत आहे. यावेळी नागरिक घरच्या घरी काहीतरी नव नवीन प्रयोग करुन पाहत आहेत..नव नवीन गोष्टी उलगडत आहेत. असंच काहीसं केलं आहे  मिडिया लाजाळू म्हणवल्या जाणाऱ्या या जोडप्याने म्हणजेच अमृता राव आणि आरजे अनमोल यांनी...पहिल्यांदाच अमृता आणि अनमोलने एकत्र लाइव्ह चाट केले आहे.. आणि त्यांच्या चाहत्यांनी ह्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. ह्या कठीण काळात ह्या लाईव्हद्वारा दोघांनी रेट्रो गाणी गायली आणि दोघांच्या स्वयंपाक आणि एकत्र घरातील कामे करण्याच्या पद्धतीवर विनोद करत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी केलेल्या ह्या लाईव्ह चाट मध्ये काही व्हिडीओ कॉलरमध्ये, जयपूर येथील टायगर बारोट नावाच्या एका चाहत्याच्या कुटुंबात या लॉकडाऊन दरम्यान मुलीचा जन्म झाल्याची बातमी सांगितली.. नामकरण सोहळ्यासाठी कुटुंबातून कुणालाही घरी आमंत्रित करू शकत नसल्यामुळे टायगरने अमृताला आपल्या नवजात मुलीला ‘द’ अक्षरावरून नाव सुचवण्याची विनंती केली.

अमृता आणि अनमोल ह्या प्रसंगामुळे भारावून गेले आणि त्यांनी त्याच्या ह्या चाहत्याच्या प्रेमाचा आणि आग्रहाचा मान ठेवत अमृताने  त्या नूतन कन्येला ‘देविका’ हे नाव सुचवले. तिने पुढे सांगितले, 'हे तिचे आवडते नाव आहे.' टायगर आणि त्याच्या कुटुंबासाठी इतका मोठा निर्णय घेताना  अंगावर शहारे येत होते."

अमृताच्या ह्या नावाच्या प्रस्तावाने आनंदित चाहत्याने ह्या प्रसंगी म्हंटले, 'राशी शी काही घेणं-देणं नाही, आता तर हीचं नाव देविकाच असेल.' त्यामुळे आपले वैयक्तिक आयुष्य खासगी ठेवलेल्या अमृता-अनमोल या जोडप्याचं हे  पहिलं लाईव्ह त्यांच्यासाठी आणि त्यांच्या चाहत्यांसाठी देखील खूपंच खास ठरलं..

amruta rao and rj anmol get a chance to namea new born baby girl in their first insta live together  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE Update: पाकिस्तानची लाचारी पुन्हा दिसली... पैशांसाठी आत्मसन्मान ठेवला गहाण; Jay Shah यांनी कान टोचताच खेळायला तयार

Municipal Corporation Election : महापालिका निवडणुकीसाठी लागणार २४ हजार कर्मचारी

Latest Marathi News Updates : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात भव्य ड्रोन शो

Kannad News : हैदराबाद गँझेटीयरनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या; मुख्यमंत्री फडणवीसांकडे निवेदन देऊन केली मागणी

Kunbi Certificates: ''भुजबळांना कुणबी प्रमाणपत्रांबद्दल आक्षेप असेल तर..'', फडणवीसांनी स्पष्टच शब्दात सांगितलं

SCROLL FOR NEXT