amruta subhash talk about intimate scene in lust stories 2 netflix  SAKAL
मनोरंजन

Lust Stories 2: "माझ्या नवऱ्याने त्याला सांगितलं की...", अमृता सुभाषने इंटिमेट सीन देतानाचा अनुभव केला शेअर

अमृता सुभाषने इंटिमेट सीन करतानाचा अनुभव शेअर केलाय

Devendra Jadhav

Amruta Subhash News: काही दिवसांपुर्वी 'लस्ट स्टोरीज 2' ही चार भागांची वेबसिरीज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली. या सिरीजमध्ये अभिनेत्री कोंकणा सेनने दिग्दर्शित केलेला 'द मिरर' हा एपिसोड प्रदर्शित झाला. या सिरीजमध्ये अभिनेत्री अमृता सुभाष आणि अभिनेता श्रीकांत यादव यांचे इंटिमेट सीन होते. त्याबद्दल अमृताने नेटफ्लिक्स राऊंडटेबल मुलाखतीत याबद्दल भाष्य केलंय.

अमृताच्या लस्ट स्टोरीज 2 मधील तिच्या भूमिकेची खुप चर्चा केली. यावेळी राऊंडटेबलमध्ये बोलताना अमृताने शेअर केले की, "सिरीजमधील तिचा सहकलाकार श्रीकांत यादव हा तिचा सर्वात चांगला मित्र आहे. त्यामुळे त्याच्यासोबत इंटिमेट सीन करण्याआधी अमृताने दिग्दर्शक कोंकणा सेन शर्माकडे थोडा वेळ मागितला."

अमृताने पुढे सांगितले की, "ती आणि श्रीकांत दोघांनाही त्यांच्या खुप वर्षांच्या मैत्रीमुळे इंटिमेट सीन करण्याची काहीशी चिंता वाटत होती. मी जेव्हा स्क्रिप्ट वाचली, तेव्हा खूप इंटिमेट सीन्स होते आणि मला त्यांची भीती वाटते. म्हणून मी कोकोला (कोंकणा सेन शर्मा) सांगितले की मला श्रीकांतसोबत एक दिवस हवा आहे. कारण आमची अनेक वर्षांपासुन मैत्री असल्याने मला त्याच्याशी बोलायची गरज होती. श्रीकांत माझ्यासोबत हे सीन करायला तयार नव्हता’

पुढे माझा नवरा संदेश त्याचा मित्र आहे. संदेश सुद्धा एक अभिनेता आहे. संदेशने त्याला सांगितले 'तु करशील. आणि चांगलं करशील." अमृता म्हणाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

Sachin Ahir: उपसभापतिपदाची प्रतिष्ठा वाढवेन: सचिन अहिर यांची ग्वाही; कष्टकरी, कामगार, महाराष्ट्राशी बांधिलकी सोडणार नाही!

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

सौरऊर्जा मीटर जोडणीच्या ऑर्डरसाठी घेतली ४ हजार रुपयांची लाच; सहायक अभियंत्याला रंगेहात पकडलं...

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

SCROLL FOR NEXT