Bollywood Ananya Panday Esakal
मनोरंजन

Ananya Panday: अनन्याचा गृहप्रवेश! अभिनेत्रीनं स्वत:लाच दिलं दिवाळी गिफ्ट...

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन घरात प्रवेश केला आहे.

Vaishali Patil

Ananya Panday New Home: सध्या सर्वत्र दिवाळीचा उत्सव पहायला मिळत आहे. त्यात काल धनत्रयोदशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या खास दिवशी लोकं अनेक गोष्टी खरेदी करताना दिसतात. या दिवशी बॉलिवूड कलाकारांनीही खरेदीचा आनंद घेतला आहे. बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे हिने धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन घरात प्रवेश केला आहे.

धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर अनन्या पांडेने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने मुंबईत नवीन घर घेतले आहे. सोशल मीडिया पोस्ट शेयर करत अनन्याने तिच्या नवीन घराची झलकही चाहत्यांना दाखवली आहे

अनन्याने तिच्या नवीन घरातील काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अनन्या लिहिते की, "माझे स्वतःचे घर!! नवीन सुरुवातीसाठी तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे!!! धनत्रयोदशीच्या शुभेच्छा."

नवीन घरात प्रवेश करताना तिने घरी पूजाही केली. तर एका व्हिडिओत ती गृहप्रवेश पूजा करताना दारात नारळ फोडताना दिसत आहे.

सध्या अनन्याचे हे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. नेटकरी आणि सर्वच कलाकार तिचे अभिनंदन करत आहेत.

अनन्याची आई भावना पांडे यांनी या पोस्टवर कमेंट करत लिहिले, 'मला तुझा खूप अभिमान आहे.' तर टायगर श्रॉफने 'वाह, अभिनंदन अनन्या.' असं लिहिलं आहे.

गौहर खान, परिणीती चोप्रा, शिल्पा शेट्टी, फराह खानसह इतर अनेक सेलिब्रिटींनीही अनन्या पांडेला तिच्या नवीन घरासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

अनन्या पांडेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने 2019 मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर 2'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. चार वर्षांच्या कारकिर्दीत अनन्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे.

ती नुकतीच ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात दिसली. आता ती 'खो गये हम कहाँ' मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरवसोबत काम करणार आहे.

यासोबतच ती प्राइम व्हिडिओचा वेब शो 'कॉल मी बे' मध्ये देखील काम करणार आहे. याशिवाय 'कंट्रोल' आणि 'शंकरा' या तिच्या आगामी सिनेमांची चर्चा आहे. सध्या ती आदित्य कपुरसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vishalgad Qurbani Permission : किल्ले विशाळगडावर उरुस काळात सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देण्यास बंदी; मांसाहार नेण्याबाबत कोर्टाचा काय आहे आदेश?

Vishnu Sahasranama: अधिक मासात विष्णू सहस्त्रनामाचा जप का करतात? रोजही वाचण्याचे आहेत आश्चर्यकारक फायदे

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत आयपीएल क्रिकेट बेटिंग प्रकरणी भाजपच्या नगरसेवकाला अटक

Pargaon News : अष्टविनायक महामार्गावर अनेक ठिकाणी डांबर उखडून पडले खड्डे; तर महामार्गावरील अनेक बसथांब्यांची दुरावस्था झाली आहे

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

SCROLL FOR NEXT