Ananya Pandes got trolled while walking on the ramp
Ananya Pandes got trolled while walking on the ramp esakal
मनोरंजन

Ananya Panday : 'मच्छरदाणी घालून कुठं निघाली'? पॅरिसमध्ये अनन्या पांडे झाली ट्रोल!

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Ananya Pandes got trolled while walking on the ramp : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे ही नेहमीच लाईमलाईटमध्ये असणारी सेलिब्रेटी आहे. यापूर्वी तिला वेगवेगळ्या कारणांमुळे ट्रोल व्हावे लागले आहे. आताही पॅरिसमधील फॅशन शो मध्ये अनन्यानं घेतलेला सहभाग तिच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसतो आहे.

अनन्याचा रँप वॉक...

सोशल मीडियावर अनन्याचा रँप वॉक चांगलाच व्हायरल झाला आहे. अनन्या नेहमीच तिच्या हटक्या लूकमुळे चर्चेत राहिली आहे. बॉलीवूडमधील स्टार सेलिब्रेटी म्हणून ती लोकप्रिय आहे. तिच्या नावाला मिळणारा प्रतिसाद आणि प्रसिद्धी मोठी आहे. आता अनन्या पॅरिसमधील एका शो मध्ये रँप वॉक करताना दिसली. मात्र तिला ट्रोल व्हावे लागले आहे.

पॅरिस हाऊस कोचर वीक (Paris House Coucher Week) मध्ये अनन्यानं केलेलं रँम्प वॉक हे चर्चेत आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर अनन्याला ट्रोल व्हावे लागले आहे.

अनन्याच्या व्हायरल झालेल्या त्या व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, तुझ्यापेक्षा तर उर्फी बरी, ती चांगले कपडे परिधान करते. ही तू मच्छरदानी घालून कुठं चालली, असा प्रश्न नेटकऱ्यांनी तिला विचारला आहे. खरं तर यापूर्वी देखील अनन्यावर नेटकऱ्यांनी टीका केल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, करवा चौथचे मॉर्डन व्हर्जन. तिसऱ्यानं म्हटलं आहे, अशा प्रकारचे कपडे घालून कुठं जायचं आहे?

अनन्या पांडेच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास गेल्या वर्षी आयुषमान खुराणासोबत ड्रीम गर्ल २ मध्ये दिसून आली होती. त्यानंतर तिचा खो गये हम कहा मध्ये वेगळा परफॉर्मन्स दिसून आला होता.नेटफ्लिक्सवर आलेल्या या चित्रपटानं चाहत्यांची पसंती मिळवली होती. यंदाच्या वर्षात तिच्याकडे काही महत्वाचे चित्रपट असल्याचे सांगण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Paresh Rawal: "मतदान न करणाऱ्यांचे टॅक्स वाढवा.."; परेश रावल यांनी केली शिक्षेची मागणी

RCB vs CSK: चेन्नईला पराभूत झालेलं पाहताच दिग्गज क्रिकेटरचे पाणावले डोळे, Video होतोय व्हायरल

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Apple News : ॲपल कंपनीने नाकारले १७ लाख ऍप ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

SCROLL FOR NEXT