Maharashtrachi Hasyajatra, Maharashtrachi Hasyajatra video, Maharashtrachi Hasyajatra comedy video, ashvini bhave, samir chaugule SAKAL
मनोरंजन

Maharashtrachi Hasyajatra: आणि अश्विनीला पाहून समीर लाजला.. दिलं लिंबू कलरचं हे खास गिफ्ट

महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे सहभागी होणार आहेत.

Devendra Jadhav

Ashvini Bhave in Maharashtrachi Hasyajatra News: महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो टीव्हीवर लोकप्रिय आहे. या शोमध्ये आजवर अनेक सेलिब्रिटींनी खास पाहुणे म्हणून हजेरी लावली.

हास्यजत्रा शोमध्ये समीर चौगुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, चेतना भट, शिवाली परब असे अनेक कलाकार मंचावर अक्षरशः धुमाकूळ घालतात.

आता महाराष्ट्राची हास्यजत्रा शो मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे सहभागी होणार आहेत.

(And Sameer chaugule gave this special gift Ashwini bhave in Maharashtrachi Hasyajatra video viral)

महाराष्ट्राची हास्यजत्राचा नवीन प्रोमो आऊट झालाय. या प्रोमोत अश्विनी भावे यांची शो मध्ये ग्रँड एंट्री झालीय. अश्विनी भावे खास जांभळ्या रंगाच्या साडीत हास्यजत्रेत सहभाग झाल्यात.

यावेळी समीर चौगुले यांनी त्यांचं गाजलेलं स्किट पुन्हा सादर केलं. शिवाला हे खरंय का? असं म्हणत समीर चौगुले त्यांचं स्किट सादर करतात. अश्विनी भावे सुद्धा हे स्किट एन्जॉय करत असतात.

आणि अशातच समीर बोलता बोलता म्हणतो.. काही वर्षांपूर्वी अश्विनी मॅडमला लिंबू कलरची साडी मिळाली होती, आज त्यांना मी लिंबू कलरचा पट्टा गिफ्ट करतो. असं म्हणत समीर धावत अश्विनीकडे जातात आणि त्यांच्या हातात पट्टा देतात.

हे स्किट झाल्यावर कमेंट करताना अश्विनी समीरला म्हणतात.."समीर जितका तू सुंदर तू लाजलास तितकं सुंदर मलाही लाजता येत नाही." हे म्हणताच उपस्थित प्रेक्षकांमध्ये मस्त हशा पिकला.

अश्विनी भावे यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्राची हास्यजत्रेला मिळाली आहे. अश्विनी कुटुंबासोबत अमेरिकेत राहत आहेत.

अश्विनी सध्या भारतात आल्या असून त्यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रेला लावलेली विशेष उपस्थिती सगळ्यांच्या चर्चेत आहे.

अश्विनी यांनी काही वर्षांपूर्वी ध्यानीमनी आणि मांजा अशा मराठी सिनेमांमध्ये अभिनय केला. अश्विनीच्या नवीन प्रोजकेट्सची त्यांचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Nashik Crime : अघोरी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचा विनयभंग; नाशिकमध्ये भोंदूबाबावर पोक्सोचा गुन्हा

'पहाटेची वेळ आणि बसमध्ये पुरुषांचे घाणेरडे स्पर्श' भारती सिंहने सांगितला भयंकर अनुभव म्हणाली...'त्याने मला घट्ट पकडलं आणि...'

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

Pune News : गणेशोत्सवात गुन्हेगारीला ‘नो एन्ट्री’ ! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा सराईत गुन्हेगारांना इशारा

SCROLL FOR NEXT