Karan Kundra,Shamita Shetty,Nishant Bhatt Google
मनोरंजन

आणि हिंदी 'बिग बॉस 15' चा विनर आहे'....'; एका स्पर्धकानेच दिले संकेत

दरवेळेप्रमाणे यावेळचा शो ही अनेक वादांनी चर्चेत राहिला.

प्रणाली मोरे

बिग बॉस(Big boss) हा शो मग तो मराठीत असो की हिंदीत तिथे वाद नसतील तर शो रंगत नाही. म्हणजे वादाचं आणि या शो चं खूप जवळचं कनेक्शन आहे. यंदाचा या शो सिझन १५ ही त्याला अपवाद नाही. पण यंदा सुरुवातीला शो चा टीआरपी हवा तसा नव्हता. म्हणजे आलेले हे स्पर्धक फारच गुडी-गुडी वागत होते. त्यांच्यात हवे तसे वाद रंगत नव्हते. मग काय, असं झालं की शो ची क्रिएटिव्ह टीम नेहमीच वाइल्ड कार्ड एन्ट्रीचा आधार घेते. आणि मग शो ला तडका कसा बसेल यावर अधिक काम करते. यावेळीही वाइल्ड कार्ड एन्ट्रीद्वारे अभिजित बिचुकले,देबोलिना भट्टाचार्जी,राखी सावंत,तिचा खोटा नवरा रितेश,रश्मी देसाई असे काही जण घरात आणले गेले. त्यानंतर अभिजित बिचुकलेने मात्र घरात नुसता हैदोस घातलेला पहायला मिळाला.

आपल्या विचित्र वागण्यानं त्यानं घरातल्या इतर सदस्यांना सळो की पळो करीन सोडलं. इतकंच काय तर त्यानं सलमानशीही पंगा घेतलेला आपण पाहिला. करण-तेजस्वीची प्रेमकहाणी पाहून वाटलं बिग बॉस मध्ये एखादी इनहाऊस मालिका सुरू आहे की काय. प्रेम किती खरं-खोटं दोघं बाहेर आल्यावर काही काळ गेल्यावर कळेलच. असो आता चर्चा हे सगळं करण्याची नाही. तर आता शो चा प्रवास हा फिनाले च्या दिशेने सुरू आहे. 'टिकट टू फिनाले' साठी घरातील स्पर्धक एकमेकांना काटे की टक्कर देतान दिसत आहेत. त्यामध्ये करण,शमिता,निशांत,प्रतिक,राखी,तेजस्वी यांनी बाजी मारली आहे. त्यातच आता राजीव अदातियाची घरात वाइल्ड कार्डने एन्ट्री झाली आहे. एकूणच आता बिग बॉ़स च्या फायनलमध्ये कोणते स्पर्धक असतील हे चित्र हळूहळू स्पष्ट होत असताना घरातून बाहेर पडलेल्या एका स्पर्धकानं चक्क विनरसाठी पात्र असलेली नाव घेत मोठा खुलासा केला आहे.

उमर रियाझ हे नाव आता बिग बॉसमुळे ज्याच्या त्याच्या तोंडावर आहे. त्याला शो मधून बेदखल करण्यात आल्यावर त्याच्या फॅन्सनी त्याच्या सपोर्टमध्ये सोशल मीडियावर जे काही कॅम्पेन चालवले होते ते आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल. त्याच उमर रियाझनं 'बिग बॉस 15' चा विनर कोण असेल याबाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे. उमरला रस्त्यात काही मीडियाच्या कॅमेरामननी गाठलं आणि विचारलं की,'' बिग बॉसचा संभाव्य विजेता कोण असू शकेल?'' तेव्हा तो जरी म्हणाला असला की सगळ्यांनीच मेहनत घेतली आहे. तरी त्यानं पटकनं सुरुवातीला घेतलेलं करण आणि शमिताचं नाव ऐकून वाटतंय या दोघांमध्येच फिनालेला काटे की टक्कर पहायला मिळेल. त्यात करण हे नाव उमरनं लगेच पहिल्यांदा घेतलं, त्यावरनं करण कुंद्रा यंदाचा 'बिग बॉस विनर' ठरेल याचे अंदाज बांधले जात आहेत. आता उमरने या सगळ्या स्पर्धकांना जवळजवळ १०० दिवस जवळून अनुभवलंय त्यामुळे त्याचा अंदाज चुकीचा ठरणार नाही हे निश्चित.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT