Kedar shinde  Team esakal
मनोरंजन

'आमची तारीख जाहीर'; केदार शिंदे यांच्या ट्विटची चर्चा

केदार शिंदे यांच्या ट्विटची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

मराठी चित्रपटसृष्टीला दर्जेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक म्हणजे केदार शिंदे. ते नेहमी नवनवीन प्रयोग करत प्रेक्षकांच मनोरंजन करत असतात. सामान्य माणसाच्या आजुबाजूला घडणाऱ्या गोष्टी केदार शिंदे उत्तम पद्धतीने मोठ्या पडद्यावर दाखवतात. केदार यांचा नवीन चित्रपट त्याच्या नावामुळे चर्चेत आला आहे. ‘बाईपण भारी देवा’ असं त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. आता सोशल मीडिया पोस्टद्वारे केदार शिंदे यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर केली आहे.

केदार शिंदे यांनी ट्वीट करत ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. “कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! ‘बाईपण भारी देवा.’ २८ जानेवारी २०२२ पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!” असं ट्वीट त्यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी चित्रपटाचे पोस्टर देखील पोस्ट केलं आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात कौटुंबिक विषय मांडण्यात येणार आहे. या चित्रपटात नक्की कोण कलाकार दिसणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पोस्टर रिलीज करताच चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या चित्रपटाच्या निर्मात्या माधुरी भोसले यांच्या 'स्क्रीनशॉट्स' या संस्थेने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्क्रीनशॉट्स ही निर्मिती संस्था या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. टीव्ही, ओटीटी आणि अनेक क्षेत्रात स्क्रीनशॉर्टस संस्थेने दर्जेदार कलाकृती सादर करत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट २८ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Traffic: ठाणेकरांनो लक्ष द्या! ६ महिने 'हा' मुख्य मार्ग बंद; काय असतील पर्यायी मार्ग?

सुवर्णकाळातील चमकता तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Latest Live Update News Marathi: नवले पुलाजवळील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे भाजपकडून कोणताही जल्लोष नाही

Navale Bridge Accident : मृत्यूचा सापळा बनलाय नवले पूल, ८ वर्षांत २१० मोठे अपघात; मृत्युचे हादरवणारे आकडे समोर

Bihar Election Results: निकाल बिहारचा पण परिणाम महाराष्ट्रावर, स्थानिक निवडणुकांमध्ये काय होणार? ‘लाडकी बहीण’ ठरणार गेमचेंजर?

SCROLL FOR NEXT