aniket vishwasrao luggage missing bad experience on vistara airlines  SAKAL
मनोरंजन

Aniket Vishwasrao: "४ दिवस झाले सामानाची बॅग हरवलीय", अनिकेत विश्वासरावसोबत घडली संतापजनक घटना

अनिकेत विश्वासरावला एअरपोर्टवर वाईट अनुभव आला

Devendra Jadhav

बघतोस काय मुजरा कर, पोश्टर बॉईज अशा लोकप्रिय सिनेमांमधुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे अनिकेत विश्वासराव. अनिकेतला आपण आजवर अनेक सिनेमे, मालिका आणि नाटकांमधुन पाहिलंय.

अनिकेतला नुकताच एक संतापजनक अनुभव आलाय. अनिकेतचं सामान एअरपोर्टवरुन बेपत्ता झालंय. अनिकेतने वारंवार तक्रार करुनही त्याचं सामान सापडत नाहीय. त्याने सोशल मिडीयावर पोस्ट करुन हा प्रकार उघडकील आणलाय.

(aniket vishwasrao luggage missing bad experience on vistara airlines)

अनिकेतने दोन विमान सेवा कंपनींची केली तक्रार

अनिकेतने विमान तिकीटाचे आणि सामानाचे फोटो पोस्ट करुन हा मनस्ताप देणारा प्रकार समोर आणलाय, "प्रिय दोन निष्काळजी विमान सेवा. @vistara @vistaraairlines आणि @united.... "माझे चेक-इन बॅगेज गेल्या 4 दिवसांपासून गायब आहे". तुमच्या बाजूने एकच प्रतिसाद होता फक्त खोटी आश्वासने आणि दिशाभूल. या 4 दिवसात तुम्ही माझ्या बॅगचा मागही काढू शकला नाही."

२४ वर्षांमध्ये पहिल्यांदाच आलेला हा अनुभव

अनिकेत पुढे सांगतो, "फक्त माफीचा ईमेल माझ्या समस्येचे निराकरण करणार नाही. तुमच्या व्यावसायिकतेच्या अभावामुळे आणि तुमच्या प्रवाशांबद्दलच्या सहानुभूतीच्या अभावामुळे मला खूप त्रास होत आहेत.

मला आशा आहे की ही पोस्ट पाहिल्यानंतर आपण शक्य तितक्या लवकर आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता कराल.

मी एक प्रोफेशनल अभिनेता आहे. या इंडस्ट्रीत गेल्या २४ वर्षांपासून काम करत आहे आणि मला असा कधीच अनुभव आला नाही. मी माझे "प्ले कॉस्ट्यूम" देखील बॅगेत घेऊन जात असल्याने माझ्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. फाइल संदर्भ क्रमांक:-- EWR98426M. मला आशा आहे की भविष्यात कोणीही अशा समस्येचा सामना करणार नाही."

आता अनिकेत विश्वासरावच्या समस्येचा तोडगा निघणार का हे पाहायचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Day 4: भारताचा श्रीलंकेवर कहर! 290 धावांत ऑलआऊट करत दिला फॉलोऑन; दिनुशाचं शतकही व्यर्थ

Palghar Attack Case: कोयत्याने वार केलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू ; दोन महिन्याच्या उपचारानंतरही झुंज अपयशी

भावांची एक लाईन आणि ओवाळणाऱ्या बहिणींची दुसरी लाईन... झी मराठीच्या कलाकारांनी सांगितल्या रक्षाबंधनाच्या आठवणी

Latest Marathi News Live Update : मुंबईतील आमदारांचे रिपोर्ट कार्ड समोर; शिंदेंच्या आमदाराची कामगिरी सर्वांत खराब

CTET 2026 New Date : सीटीईटी परीक्षा देणाऱ्यांसाठी मोठी बातमी! 6 सप्टेंबरची परीक्षा पुढे ढकलली; नवी तारीख 'या' दिवशी होणार जाहीर

SCROLL FOR NEXT