Anil Kapoor Esakal
मनोरंजन

Anil Kapoor Birthday अन् अनिल कपूरची पत्नी एकटीच हनीमूनला...काय आहे तो किस्सा...

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचा 'मिस्टर इंडिया' म्हणजेच सुपरस्टार अनिल कपूर यांची गणना चित्रपटसृष्टीतील सर्वात एव्हरग्रीन अभिनेत्यांमध्ये केली जाते. ते मनोरंजन विश्वातील सर्वात आघाडीचे अभिनेते आहेत. त्यांना फिट फिटनेस फ्रिक म्हटलं जातं. अनिल कपूर आज त्याचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल कपूर नुकतेच अॅनिमल चित्रपटात दिसले.

अनिल कपूर यांचा जन्म 24 डिसेंबर 1965 रोजी झाला. अनिल कपूर यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीला अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत, पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. हे स्थान मिळवण्यासाठी अनिल यांनी जीवनात अनेक अडचणींचा सामना केला. मात्र जितका रंजक त्यांच्या संघर्ष होता. तितकीच रंजक त्यांची लव्ह लाईफही होती. अनिल आणि त्यांची पत्नी सुनिताची ओळख कशी झाली? सुरुवातीच्या काळात त्यांनी कौटुंबिक जीवनातील अनेक अडचणींचा सामाना केल्याचा खुलासा केला आहे.

तर झालं असं की एका मित्राने सुनितासोबत प्रँक कॉल करण्यासाठी तिला मूद्दाम अनिल कपूर यांचा नंबर दिला होता. सुनिताने फोन केला तेव्हा अनिल यांनी फोन उचलला आणि तेव्हा ते सुनिताचा आवाज ऐकून तिच्या प्रेमात पडले.

त्यानंतर त्यांचे बोलणे वाढू लागले. या कॉलनंतर दोघेही एका पार्टीत भेटले, जिथे दोघे पहिल्यांदा समोरासमोर आले. यानंतर हळूहळू दोघांचे बोलणे वाढले, त्यांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले हे त्यांना कळलेच नाही. अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांना यावेळी समजले होते की ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत.

ज्या काळात अनिल कपूर इंडस्ट्रीत आपली ओळख तयार करण्यासाठी धडपडत होते, त्या काळात सुनीता एक फेमस मॉडेल होती. पण त्यांनी अनिलची साथ न सोडता प्रत्येक पावलावर त्यांना साथ दिली. त्यावेळी अनिल कपूरकडे कॅबचे बिल भरण्यासाठीही पैसे नव्हते, तेव्हा सुनीता त्यांना पैसे द्यायची.

अनिल कपूर यांनी 19 मे 1984 रोजी सुनीतासोबत लग्न केले. अनिल यांनी केवळ 10 लोकांच्या उपस्थित हे लग्न केलं होतं. महत्वाचं म्हणजे लग्नानंतर तिसऱ्या दिवशी अनिल पुन्हा त्यांच्या कामात व्यस्त झाले होते. त्यामुळे सुनिताला एकटीच हनीमूनला गेली होती. असं अनिल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SL vs NZ, T20 WC: श्रीलंकेच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, न्यूझीलंडच्या फलंदाजांची हाराकिरी! पाकिस्तानच्या ताफ्यात आनंद

तीन वेळा डेडलाईन… तरीही योजना कागदावरच का? 'झिरो प्रिस्क्रिप्शन’चा अर्थसंकल्पात स्पष्ट उल्लेख नाही!

Google Search : फेब्रुवारी महिन्यात सगळ्यात जास्त बघण्यात आले 'हे' 5 व्हिडिओ, गुगल सर्च ट्रेंड डेटामुळे जगभर खळबळ

Latest Marathi News Live Update : विक्रोळीत चारचाकी वाहनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT