Anil Kapoor Inaugurated His Make Up Artist Deepak Chauhan Salon In Mumbai sakal
मनोरंजन

Anil Kapoor: आपल्या मेकअप आर्टिस्ट साठी अनिल कपूरनं केलं असं काही की तुम्हीही म्हणाल..

अनिल कपूर खऱ्या अर्थाने हिरो...

नीलेश अडसूळ

Anil Kapoor: Anil Kapoor: वयाची साठी गाठूनही एखाद्या तरुण अभिनेत्याला लाजवतील असे तारुण्य आणि फिटनेस म्हणजे अभिनेता अनिल कपूर. 'झक्कास' म्हणत अनिल यांनी बॉलीवुडला अक्षरशः वेड लावलं. आज वयाच्या 65 व्या वर्षीही त्यांचा कामाचा उत्साह आणि नवीन काहीतरी करून पाहण्याची धमक जबरदस्त आहे.

अनिल यांनी आजवर अनेक हिट सिनेमे दिले. आजही ते मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी आजवर प्रचंड यश आणि संपत्ती कमावली. पण त्यांनीही खूप स्ट्रगल करून हे यश मिळवले आहे. त्यामुळे आजही अनिल कपूर यांचे पाय जमिनीवर आहे. त्याचेच उदाहरण देणारा एक प्रसंग नुकताच समोर आलेला आहे. ज्याचे सध्या प्रचंड कौतुक होत आहे.

(Anil Kapoor Inaugurated His Make Up Artist Deepak Chauhan Salon In Mumbai)

नुकतेच अनिल कपूर यांनी अलीकडेच मुंबईतील एका सलूनचे उद्‍घाटन केले आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय इतके. हे तर कुणीही करेल, सेलिब्रिटी अशा कार्यक्रमांना जातातच. पान तसं नाहीय, हा सोहळा अत्यंत खास होता.

कारण अनिल कपूर यांचा मेकअप आर्टिस्ट दीपक चौहान याचेच ते सलून आहे. अनिल यांचा दीपकशी ४० वर्षांहून अधिक काळ संबंध आहे. इतकी तो अनिल कपूर यांच्यासोबत काम करत आहे. त्यामुळे केवळ प्रेमापोटी एका शब्दावर अनिल कपूर या सलुनच्या उद्घाटनाला आले. इतक्या बड्या कलाकाराने इतक्या आपुलकीने एक छोट्या सलूनचे उद्घाटन केल्याने अनिल यांचे सर्वत्र कौतुक होते आहे.

हेही वाचा : Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

या प्रसंगी अनिल कपूर यांनी रिबन कापून त्याच्या नवीन सलूनला शुभेच्छा दिल्या. दीपकला नवीन सुरुवात करताना बघून त्यांचे हृदय अभिमानाने भरून आले होते. दीपक चौहान म्हणाले, ‘मी अनिल सरांसोबत ४० वर्षांहून अधिक काळ काम करत आहे. मी खूप कृतज्ञ आहे की सर या शुभ दिवशी येथे आहेत. अनेक वर्षांपासूनचे सरांसोबतचे अनुभव माझ्याकडे आहेत. सरांनी मला नेहमीच चांगले काम करण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास प्रवृत्त केले आहे’.

अनिल कपूर हे खऱ्या अर्थाने अनेकांचे हिरो मानले जातात. अनिल कपूर आगामी ‘ॲनिमल’मध्ये रणबीर कपूरसोबत आणि ‘फायटर’मध्ये हृतिक रोशन, दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT