Actors Anil Kapoor, late Sridevi and Urmila Matondkar starred in Judaai. Google
मनोरंजन

अनिल कपूरनी 'जुदाई' सिनेमाला दिला होता नकार;श्रीदेवी हे कारण होतं का?

सिनेमाला २५ वर्ष झाल्याच्या निमित्तानं अनिल कपूर यांनी सिनेमाविषयीच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला.

प्रणाली मोरे

'जुदाई'..श्रीदेवी(Shridevi),अनिल कपूर(Anil Kapoor),उर्मिला मातोंडकर(Urmila Matondkar) या त्रिकुटाचा सुपरहिट सिनेमा. या सिनेमाचं कथानक,यातील स्टारकास्ट,याचं म्युझिक आणि याचं ग्रॅंजर सगळंच भन्नाट जमून आलं होतं. श्रीदेवी,अनिल कपूर सारख्या तगड्या स्टार्ससमोर उर्मिलानंही बाजी मारली होती तो हाच सिनेमा. बोनी कपूर यांच्या निर्मितीतला हा आणखी एक त्यावेळचा यशस्वी सिनेमा म्हणात येईल. २८ फेब्रुवारीला या सिनेमानं तब्बल २५ वर्ष पूर्ण केली आहेत. त्यानिमित्तानं सिनेमासंदर्भातली एक आठवण इथे शेअर करीत आहोत.

१९९७ चा हीट सिनेमा म्हणून जुदाईकडे पाहिलं जातं. अनिल कपूर,श्रीदेवी आणि उर्मिला मातोंडकर या सगळ्याच कलाकारांना या सिनेमाच्या यशाच श्रेय द्यावं लागेल. याचं कथानक तसं पाहिलं तर प्रत्येकजण म्हणेल हे तर काल्पनिक,प्रत्यक्ष कुठे घडतं असं. त्यावेळी ते पडद्यावर दाखवताना मोठी रिस्कच घेतली होती जणू. कारण प्रेक्षकवर्गाला हे कथानक किती रुचेल याबाबत शंकाच व्यक्त केली जात होती. पैशासाठी लालची असलेली बायको(श्रीदेवी),जेव्हा आपल्या नवऱ्याला (अनिल कपूर) एका श्रीमंत मुलीशी(उर्मिला मातोंडकर) लग्न करण्यास भाग पाडते. आणि त्यानंतर पुढे जो ड्रामा घडतो त्याला प्रेक्षकवर्गानं अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं होतं. पण या अशा कथानक असलेल्या सिनेमात काम करण्यास आधी म्हणे अनिल कपूर यांनी पूर्णतः नकार कळवला होता. त्यांनी एका मुलाखतीत आपला हा अनुभव सांगितला होता.

अनिल कपूर म्हणाले,''मी जुदाई सिनेमासाठी नकार कळवला होता. आणि माझ्या त्या निर्णयावर मी ठाम होतो. खरंतर ती भूमिका मला पटली नव्हती हा मुद्दा होता. पण मला माझ्या कुटुंबाकडून,आमच्या होम प्रॉडक्शनकडून मी हा सिनेमा करण्यासाठी सारखी मनधरणी केली जात होती. कारण त्यावेळी आम्ही आर्थिक अडचणीतून देखील जात होतो.आमच्याच प्रॉडक्शनचा 'रुप की रानी,चोरों का राजा' हा सिनेमा अपयशी ठरला होता. पुढे अनिल कपूर म्हणाले, ''जेव्हा मी अॅन्डी गार्शिया आणि मेगा रायनचा 'व्हेन ए मॅन लव्हस् ए वूमन' हा सिनेमा पाहिला तेव्हा मी 'जुदाई' सिनेमा करण्यासाठी तयार झालो. मला आता त्या निर्णयाचा आनंद आहे. मी माझ्या कुटुंबासाठी जो निर्णय घेतला तो फायद्याचा ठरला. मला या गोष्टीचा आनंद होतोय की मी दोन गुणी-कलासंपन्न अभिनेत्रींसोबत काम केलं आहे 'जुदाई' सिनेमाच्या निमित्तानं. ते दिवस खूप भन्नाट होते,तेव्हाची काम करण्याची पद्धत आणि धम्माल त्याचा एक वेगळाचा औरा आहे. असंही अनिल कपूर यांनी आपल्या मुलाखतीत नमूद केलं.

'जुदाई' सारख्या सिनेमात काम करायला तयार झाल्यावर लोकांनी असा सिनेमा का करतोय म्हणून मन वळवलं नाही का तुमचं? यावर अनिल कपूर यांनी दिलेलं उत्तर त्यांची सिनेइंडस्ट्रीतली लॉंग इनिंग कशी यशस्वी ठरली यावर उत्तम उत्तर आहे. ते म्हणाले,''मी 'परिंदा','ईश्वर','१९४२-ए लव्ह स्टोरी','मि.इंडिया','विरासत','पुकार' असे वेगळे सिनेमे केले म्हणूनच मी मोठी इनिंग खेळू शकलो. 'जुदाई' सिनेमातील 'हा मुझे प्यार हुआ' या गाण्याच्या शूटिंगचा अनुभव सांगताना ते म्हणाले,''मी सनग्लासेस घातले होते. त्यात मला करायचं इतकंच होतं की,सनग्लासेस काढून माझ्या जॅकेटच्या खिशात ठेवायचे आणि उर्मिलाकडे पहायचं. पण गाण्याचा शॉट सुरू झाला अनं माझ्या लक्षात आलं की मी घातलेल्या जॅकेटला खिसे नाहीत. आणि त्यावेळी मी पू्र्ण तो गाण्याचा शॉट सनग्लासेस डोळ्यावर घालूनच दिला. कारण मला सुचत नव्हतं आता मी काय करू. पण त्यावेळी माझ्यावर अख्खं क्रू खो-खो हसत होते. ते सगळे दिवस आठवले की आजही खूप रीफ्रेश होतो मी''. अनिल कपूर यांनी 'जुदाई' सिनेमाला नकार का दिला होता याचं खरं कारण फार नंतर कळालं,जे आता या बातमीत दिलं आहे. पण त्यावेळी मात्र श्रीदेवी-बोनी कपूर यांच्यातील नात्यामुळे अनिल नाराज आहेत अशीच बातमी पसरली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayakwadi Dam : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडले, १ लाख १५ हजार क्युसेकने विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Viral: पहिल्यांदा चावला तर १० दिवस तुरुंग; पुन्हा चावला तर आजीवन कारावास, भटक्या कुत्र्यांसाठी प्रशासनाचा अनोखा नियम

BMWने उडवलं, केंद्रीय अर्थ मंत्रालयातील उपसचिवाचा मृत्यू, पत्नी गंभीर; महिलेला अटक

IND vs PAK : टीम इंडियाचं वाकडं करू शकत नाही, म्हणून पाकिस्तानची ICC कडे तक्रार; तिथे कोण बसलाय हे ते बहुधा विसरलेत...

Pune Water Crisis : नळाच्या पाण्यात आढळल्या चक्क अळ्या; वैदूवाडी, आशानगरमध्ये महिलांकडून थाळ्या वाजवून संताप व्यक्त

SCROLL FOR NEXT