Anil Kapoor
Anil Kapoor  Instagram
मनोरंजन

अनिल कपूर म्हणाले, "या अभिनेत्रीसाठी माझ्या पत्नीलाही सोडायला तयार"

स्वाती वेमूल

निर्माता, दिग्दर्शक करण जोहरचा Karan Johar प्रसिद्ध चॅट शो हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. या शोमध्ये हजेरी लावलेल्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तर काही जण करणच्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरामुळे चर्चेचा विषय ठरले आहेत. अशाच एका एपिसोडमध्ये अनिल कपूर Anil Kapoor, संजय दत्त आणि कंगना रणौत Kangana Ranaut यांनी हजेरी लावली होती. यावेळी या तीन कलाकारांसोबत करणने रॅपिड-फायर सेशन आयोजित केला होता. करणने विचारलेल्या काही प्रश्नांची उत्तरं त्यांना विचार न करता अवघ्या काही सेकंदात द्यायची होती. या सेशनमध्ये संजय दत्त, कंगना रणौत आणि अनिल कपूर यांनी विविध प्रश्नांना भन्नाट अशी उत्तरं दिली. मात्र त्यापैकी अनिल कपूर यांनी दिलेल्या एका उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या.

करणने रॅपिड फायर सेशनमध्ये अनिल कपूर यांना विचारलं, "अशा एका महिलेचं नाव सांगा, जिच्यासाठी तुम्ही तुमच्या पत्नीलाही सोडायला तयार असाल". त्यावर अनिल कपूर कंगनाकडे बोट दाखवत तिचं नाव घेतात. त्यांनी दिलेलं हे उत्तरं ऐकून करणसुद्धा चकीत होतो. तो कंगनाला म्हणतो, "मला असं वाटतं, तुला या गोष्टीची चिंता वाटली पाहिजे."

याशिवाय अनिल कपूर यांनी इतरही काही प्रश्नांची उत्तरं मजेशीरपणे दिली. "एक अशी गोष्ट सांगा जी तुमच्याकडे नाही, पण संजय दत्तकडे आहेत", असा पुढचा प्रश्न करणने विचारला. त्यावर अनिल कपूर पटकन म्हणाले, "कोर्ट केसेस." यावेळी अनिल कपूर हे बॉलिवूडमधील बऱ्याच गोष्टींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले. स्क्रिप्ट न आवडल्याने आमिर खान आणि असिन यांचा 'गजनी' हा चित्रपट नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे 'बधाई हो बधाई' या चित्रपटाच्या वेळी शिल्पा शेट्टीने केलेले लिप फिलर्स अजिबात आवडले नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.

अनिल कपूर लवकरच 'जुग जुग जियो' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यामध्ये त्यांच्यासोबत वरुण धवन, कियारा अडवाणी आणि नीतू कपूर हे कलाकार दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT