anil kapoor, sonam kapoor 
मनोरंजन

सोनमला निर्लज्ज म्हणणाऱ्याला अनिल कपूर यांचं विनम्रतेने उत्तर

अनिल कपूर यांच्या उत्तराने जिंकली नेटकऱ्यांची मनं

स्वाती वेमूल

अभिनेते अनिल कपूर यांनी नुकतंच अरबाज खानच्या 'पिंच' या चॅट शोमध्ये हजेरी लावली. या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून त्यात अनिल कपूर हे ट्रोलर्सना उत्तर देताना दिसत आहेत. अरबाजने सोशल मीडियावरील काही कमेंट्स अनिल कपूर यांना दाखवले होते. त्यातील एका कमेंटमध्ये अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा ट्रोलरसने 'निर्लज्ज' असं म्हटलं होतं. या कमेंटवर अनिल कपूर यांनी अत्यंत विनम्रतेने उत्तर दिलं.

'बाबा आणि मुलगी दोघंही निर्लज आहेत. पैशांसाठी ते काहीही करू शकतात', अशी कमेंट एका नेटकऱ्याने केली होती. या नकारात्मक कमेंटवर अनिल कपूर यांनी शांतपणे उत्तर दिलं. 'त्यांनी अशी कमेंट केली असेल तर कदाचित ते चांगल्या मूडमध्ये नसतील किंवा आयुष्यात ते दु:खी असतील', असं ते म्हणाले. सोनम कपूर ही अनिल कपूर आणि सुनिता कपूर यांची मोठी मुलगी आहे. अनिल आणि सुनिता यांना रिया आणि हर्षवर्धन ही दोन मुलंसुद्धा आहेत.

आनंद अहुजाशी लग्न केल्यानंतर सोनम लंडनला राहायला गेली. शूटिंगनिमित्त किंवा कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती भारतात परतते. कुटुंबीयांपासून सोनम लांब राहण्याबाबत अनिल कपूर 'हिंदुस्तान टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते, "इतर पालकांप्रमाणेच, मला आणि सुनितालासुद्धा सोनमची खूप आठवण येते. तिच्याबद्दल आम्हाला कायम काळजी वाटत असते. पण सुदैवाने सध्याच्या काळात आपण मुलांसोबत व्हिडीओ कॉलवर बोलू शकतो. हा आम्हाला मोठा दिलासा आहे." बहीण रियाच्या लग्नासाठी सोनम नुकतीच मुंबईला आली होती. यावेळी अनिल कपूर तिला घ्यायला विमानतळावर गेले होते. वडिलांना पाहून सोनमला विमानतळावर अश्रू अनावर झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar: निष्काळजीपणाचा कळस! डॉक्टरांचे दुर्लक्ष अन् नवजात बाळ तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडलं,...घटनेनं संताप

Hockey Jersey Controversy: हॉकी संघाच्या भगव्या जर्सीवरून वाद पेटला, अध्यक्षांना अंधारात ठेवून निर्णय घेतला... Email ने उडवली खळबळ; नेमका वाद काय?

'आम्ही एकत्र जेवतो, गप्पा मारतो...' 'सनई चौघडे'मुळे पुन्हा भेटल्या कॉलेजच्या मैत्रिणी; मेघना एरंडेचा खास खुलासा, म्हणाली...

Latest Marathi News Live Update : जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंड धबधबा प्रवाहित

Valti Bridge Danger: ४० वर्षांपूर्वीचा वळती-मांगीरबाबा पुल वाहतुकीसाठी धोकादायक

SCROLL FOR NEXT