Animal Box Office Collection Day 7:  Esakal
मनोरंजन

Animal Box Office Collection Day 7: सातव्या दिवशी 'अ‍ॅनिमल' सुस्तावला! मात्र कमाईचा आकडा वाढताच

सातव्या दिवशी 'अ‍ॅनिमल' जरा शांत झाला!

Vaishali Patil

'Animal' box office collection: 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाची क्रेझ सध्या सर्वत्र दिसत आहे. हा चित्रपट केवळ प्रेक्षकांच्या मनावरच नाही तर बॉक्स ऑफिसवरही राज्य करत आहे.

अ‍ॅनिमल बॉक्स ऑफिसवर एकामागून एक रेकॉर्ड मोडत आहे. चित्रपट रिलिज होऊन सात दिवस झाले असले तरी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.

रिलीजच्या सहाव्या दिवशी 300 कोटींहून अधिक कमाई करणाऱ्या 'अ‍ॅनिमलने सातव्या दिवशी किती कोटींची कमाई केली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर अ‍ॅनिमलने रिलिजच्या सातव्या दिवशी किती कोटींचा गल्ला जमवला हे जाणून घेऊया.

रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमांच्या यादीत अ‍ॅनिमल हा चित्रपट अग्रस्थानी असेल. चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर अ‍ॅनिमलने 63 कोटींच्या कलेक्शनसह धमाकेदार ओपनिंग केली होती, तर दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी आणि चौथ्या दिवशी 'अ‍ॅनिमल'ने 43.96 कोटी रुपयांची कमाई केली.

तर पाचव्या दिवशी देखील अ‍ॅनिमलचे कलेक्शन कमी झाले नाही. चित्रपटाने पाचव्या दिवशी 37.47 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर सहाव्या दिवशी 'अ‍ॅनिमल'ने 30.39 कोटी रुपयांची कमाई केली. या आकडेवारीत सातव्या दिवशी थोडी घट झाली.

Sacknilk रिपोर्टनुसार, 'अ‍ॅनिमल' ने रिलीजच्या सातव्या दिवशी 25.50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या आकडेवारीसह अ‍ॅनिमल'ने एकूण सात दिवसात 338.85 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

आता अ‍ॅनिमल' चित्रपट ओटीटीवर येणार असल्याच्या चर्चाही सुरु आहे. हा सिनेमा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर धडकणार असल्याचे बोलले जात आहे.

संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी हिंदी, तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. यात रणबीर कपूर व्यतिरिक्त बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना, तृप्ति डिमरी आणि अनिल कपूर यांनी 'अ‍ॅनिमल’मध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs GT Live: गुजरात टायटन्सने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली! KL Rahul चे शतक हुकलं अन् डेव्हिड मिलरचे प्रयत्नही फसले, दिल्ली कॅपिटल्स १ धावेने हरले

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

SCROLL FOR NEXT