Animal fame Sandeep Reddy Vanga  esakal
मनोरंजन

Animal Controversy : 'तुम्ही तुमच्या मुलाला तेव्हा का नाही सल्ला दिला'? 'ॲनिमल'चा दिग्दर्शक जावेद अख्तरांवर भडकला!

प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी एका (Javed Akhtar Comment) कार्यक्रमातून संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल या चित्रपटावर कडाडून टीका केली होती.

युगंधर ताजणे

Animal fame Sandeep Reddy Vanga : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा गेल्या वर्षी ॲनिमल (Animal Movie Latest News) नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. हा चित्रपट जेवढा लोकप्रिय झाला तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर टीकाही झाली आहे.त्यात बॉलीवूडमधील अनेक प्रसिद्ध सेलिब्रेटींनी त्या चित्रपटावर तोफ डागली आहे.

प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी एका (Javed Akhtar Comment) कार्यक्रमातून संदीप रेड्डी वांगाच्या ॲनिमल या चित्रपटावर कडाडून टीका केली होती. यावेळी त्यांनी या चित्रपटातून महिलांचे विकृत चित्रिकरण केले असून त्यांच्याविषयीचा चूकीचा मेसेज समाजात असल्याचे म्हटले होते. महिलांवरील अन्याय, अत्याचार याविषयी त्यात केलेले चित्रण काय सांगते असा प्रश्न अख्तर यांनी विचारला होता.

केवळ जावेद अख्तरच नाही तर अभिनेत्री कंगना रनौत, दिग्दर्शिका किरण राव, कोंकणा सेन शर्मा यांनी देखील वांगा रेड्डीच्या चित्रपटाविषयी नाराजी व्यक्त केली होती. आता दिग्दर्शकानं जावेद अख्तर यांना जशास तसे उत्तर दिले आहे. तो काय म्हणाला हे आपण जाणून घेणार आहोत. या चित्रपटातून स्त्री द्वेष आणखी वाढेल असे अख्तर म्हणाले होते. त्यानंतर सोशल मीडियातून वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले होते.

अख्तरांच्या त्या विधानावर आता रेड्डीनं त्यांना उत्तर दिले आहे. जेव्हा जावेद अख्तर यांच्या मुलानं मिर्झापूर नावाच्या एका मालिकेची निर्मिती केली होती तेव्हा त्याला त्याबाबत सल्ला का दिला नव्हता. मला असे वाटते की, त्यांनी ती फिल्म पूर्णपणे पाहिली नव्हती. फरहानला देखील त्यांनी काही सल्ले द्यायला हवे होते.

एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवीगाळ त्या मालिकेत आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल की काय आहे त्या मालिकेत अशा वेळी जावेद अख्तर यांनी त्यांच्या मुलाला का नाही सल्ला दिला, दुसऱ्यांच्या चित्रपटांवर बोलताना आपल्या मुलाच्या चित्रपटांकडे पाहणार आहे की नाही, असा सवाल वांगा रेड्डीनं यावेळी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यादरम्यान वाहतुकीत मोठे बदल; कोणते मार्ग बंद राहणार?

Thane News: भाईंदर-ठाणे प्रवास होणार वेगवान! कॉरिडॉर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ट्रॅफिक जामला ब्रेक मिळणार, कसा असेल मार्ग?

Ketan Agrawal Murder Case: सिया गोयलच्या वकीलपत्रासाठी दोन वकिलांमध्ये पेटला वाद! अ‍ॅड. विपूल दुशिंग यांचं म्हणणं काय?

Latest Marathi News Live Update: विधानसभेत 'पश्चिम बंगाल सार्वजनिक सुरक्षा आणि समाजकंटक कारवायांवरील नियंत्रण विधेयक, २०२६' मंजूर करण्यासाठी मतदान सुरू

Marriage Numerology : 'या' मुलांकाच्या लोकांना बायकोच्या रूपात मिळते लक्ष्मी; पतीच्या यशामागे असतो फक्त तिचाच हात

SCROLL FOR NEXT