Animal Movie Ranbir Kapoor Bobby Deol esakal
मनोरंजन

Animal Movie : बॉबी अन् रणबीरचा 'किसिंग सीन', नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणाऱ्या अ‍ॅनिमलमध्ये 'तो' सीन दाखवणार? अभिनेत्याचा मोठा खुलासा

दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे.

युगंधर ताजणे

Animal Movie Ranbir Kapoor Bobby Deol : दाक्षिणात्य दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाच्या अॅनिमलनं बॉक्स ऑफिसवर कमाल केली आहे. हटक्या विषयावरील या चित्रपटानं गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच प्रकारच्या वातावऱणाची निर्मिती केली आहे. थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर हा चित्रपट ओटीटीवर येण्यास सज्ज झाला आहे.

अॅनिमलमध्ये बॉबी आणि रणबीरमध्ये एक किसिंग सीन आहे अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. यावर बॉबीनं दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याविषयी खुलासा केला आहे. थिएटरमध्ये हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्यातून तो सीन काढून टाकण्यात आला होता.

क्विंटला दिलेल्या त्या मुलाखतीमध्ये बॉबीनं सांगितलं की, संदीपनं थिएट्रीकल रिलीजच्यावेळेस तो किसिंग सीन डिलीट केला होता. मात्र आता जेव्हा तो ओटीटीवर प्रदर्शित होईल तेव्हा तो दाखवला जाईल अशी शक्यता आहे. बॉबीनं म्हटलं आहे की, जेव्हा अबरार आणि रणविजय यांच्यात फाईट होते तेव्हा अबरार अचानक रणबीरला किस करतो. त्यानंतर रणबीर त्याला मारुन टाकतो.

अॅनिमलमधून बॉबीनं प्रेक्षकांना जिंकून घेतले आहे. त्याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर लॉर्ड बॉबी या नावानं त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतो आहे. त्यानं त्या चित्रपटामध्ये अबरारची भूमिका साकारली आहे. क्लायमॅक्समध्ये अबरार आणि रणविजय यांच्यात जोरदार हाणामारी होते. त्यात अबरार रणविजच्या अंगावर झेपावतो. त्याविषयी बॉबीनं त्याच्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं होतं.

आम्ही एकाच परिवारातील आहोत. आमच्यात खूप प्रेम आहे. शेवटी कुटूंब जास्त महत्वाचे असा विचार दिग्दर्शक संदीपचाही होता. फाईट सिक्वेन्ससाठी आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तो क्षण फारच वेगळा होता. मी रणबीरला फाईट मारावी आणि त्याच्यावर झडप घालावी असे संदीपचे म्हणणे होते. यातून हेच सांगायचे होते की, मी श्रेष्ठ आहे. ताकदवर आहे. आणि शेवटी विजय हा नायकाचाच होतो. हे त्यातून दर्शवायचे होते.

बॉक्स ऑफिसवर संदीप वांगाचा अॅनिमल अजुनही मोठी कमाई करताना दिसतो आहे. या चित्रपटानं आतापर्यत ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याचे दिसून आले आहे. रणबीर कपूर आणि बॉबीच्या भूमिकेची चाहत्यांना, प्रेक्षकांना भुरळ पडली आहे. जगभरातून या चित्रपटानं तब्बल सातशे कोटींपेक्षा जास्त कमाई केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT