Animal ranbir kapoor rashmika mandanna censor board cuts esakal
मनोरंजन

Animal Controversy : सेन्सॉर बोर्डाची 'अ‍ॅनिमल' वर नाराजी, त्या दृश्यांना अन् शब्दांना कात्री!

साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्यार्वी त् अॅनिमलची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.

युगंधर ताजणे

Animal ranbir kapoor rashmika mandanna censor board cuts : साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीच्यार्वी त् अॅनिमलची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. १ डिसेंबर रोजी त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी त्याच्या व्हायरल टीझर अन् ट्रेलरला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतल्याचे बोलले जात आहे.

चित्रपटातील काही प्रसंग, किसींग सीन आणि व्हायलन्स यामुळे बोर्डानं कडक धोरण अवलंबले आहे. अॅनिमलमधून रणबीर कपूर आणि रश्मिका हे पहिल्याच स्क्रिन शेयर करत आहेत. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. त्यांच्या किसिंग सीनची जोरदार चर्चा रंगली असून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करेल असे सांगण्यात येत आहे. या सगळ्यात सेन्सॉर बोर्डाची अॅनिमलवर नाराजीही दिसून आली आहे.

Life Balance जाणून घ्या हा 'वेक अप काॅल' आणि बना सर्वार्थाने समृद्ध

सेन्सॉर बोर्डानं अॅनिमलला ए सर्टिफिकेट दिले असून काही सीनला कात्री लावली आहे. मेकर्सला ते सीन डिलिट करण्यास सांगितले आहे. ती दृष्यं रणबीर आणि रश्मिकाचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकर्सला सेन्सॉर बोर्डानं पाच मोठे बदल करण्यास सांगितले आहे. खासकरुन काही इंटिमेट सीनवर आक्षेप घेतले आहे. त्याची लांबी कमी करण्यास सांगितले आहे.

अॅनिमलमध्ये विजय आणि झोया यांच्यात अनेक इंटिमेट सीन्स आहेत. त्यावर बोर्डानं नाराजी व्यक्त केली आहे. दिग्दर्शक वांगानं हुआ मैं या गाण्यातून याविषयीचे संकेत दिले होते. तसेच चित्रपटातून वस्त्र नावाचा शब्द मेकर्सला वगळण्यास सांगितले आहे. त्या पॉइंटर्सची कॉपी आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

संदीप रेड्डी वांगानं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, मला आनंद आहे की, माझ्या चित्रपटाला ए सर्टिफिकेट मिळालं आहे. कारण या चित्रपटाची कथा प्रौढांसाठीची आहे. मी माझ्या मुलाला देखील हा चित्रपट दाखवणार नव्हतो. पावणे चार तासांच्या या चित्रपटात रणबीरनं खूपच प्रभावी अभिनय केला आहे. मला खात्री आहे की, त्याची ही भूमिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Cheteshwar Pujara Retirement : निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला किती पेन्शन मिळणार? BCCI चे नियम काय सांगतो?

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Bribe Case : एक कोटी घ्या आणि प्रकरण मिटवा; अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यालाच उचलला, लाच देणं पडलं महागात

SCROLL FOR NEXT