Animal Vs Sam Bahadur First Day Advance Booking esakal
मनोरंजन

Animal Vs Sam Bahadur: रणबीरचा 'अ‍ॅनिमल' की विकीचा 'सॅम बहादुर', अ‍ॅडव्हान्स बुकिंग कोण सगळ्यात पुढे?

बॉलीवूडमधील दोन तगड्या अभिनेत्यांचे मुव्ही क्लॅश होणार आहे. त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

युगंधर ताजणे

Animal Vs Sam Bahadur First Day Advance Booking : बॉलीवूडमधील दोन तगड्या अभिनेत्यांचे मुव्ही क्लॅश होणार आहे. रणबीर कपूरचा अॅनिमल आणि विकी कौशलचा सॅम बहादुर हे दोन्ही चर्चेतले चित्रपट एक डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्याची चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. त्यात अॅनिमलच्या ट्रेलरची जोरदार चर्चा आहे.

प्रख्यात दिग्दर्शिका मेघना गुलजार यांचा सॅम बहादुर हा भारताचे फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचा बायोपिक आहे. तर संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमल हा बाप लेकाच्या नात्यावर भाष्य करणारा चित्रपट असल्याचे बोलले जात आहे. अशात हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं त्यात कोण बाजी मारणार याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे. Animal Vs Sam Bahadur First Day Advance Booking

Money and Mind पैसा हवाच पण मनाची श्रीमंती-समाजऋणाचे भानही हवे!

सध्या सोशल मीडियावर अॅनिमल विरुद्ध सॅम बहादूर या दोन्ही चित्रपटांविषयी नेटकऱ्यांमध्ये पोस्ट वॉर सुरु झाले आहे. दोन्ही चित्रपटांना पहिल्याच दिवशी अॅडव्हान्स बुकिंगमधून जो प्रतिसाद मिळाला आहे त्याविषयीच्या बातम्यांना उधाण आले आहे. अॅनिमलचा ट्रेलर समोर आला असून त्याला चाहत्यांचा तुफान प्रतिसाद मिळाला आहे. त्यातील रणबीरच्या भूमिकेचं कौतुक होत आहे. दुसरीकडे सॅम बहादूरमधून विकीच्या हटक्या स्वॅगविषयी चर्चा आहे.

या सगळ्यात हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार असल्यानं बॉक्स ऑफिसवरील त्यांचा क्लॅश खूप काही सांगून जाणारा असेल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रणबीरच्या अॅनिमलला अॅडव्हान्स बूकीगमध्ये मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याच्यापुढे विकीचा सॅम बहादूर अॅडव्हान्स बुकिंगबाबत पिछाडीवर असल्याचे दिसत आहे.

सॅकनिकच्या एका रिपोर्टनुसार, सॅम बहादुरचे पहिल्या दिवशीचे बुकींग हे केवळ १२ हजार ८७६ एवढे आहे. त्यातून फार तर ४४ लाखांची कमाई अपेक्षित आहे. ही माहिती ब्लॉक सीट्सशिवायची आहे. असेही त्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे. दुसरीकडे रणबीरच्या अॅनिमलच्या अॅडव्हान्स बुकिंगविषयी सांगायचे झाल्यास हा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाचा पॅन इंडिया प्रोजेक्ट आहे.

अॅनिमलच्या अॅडव्हान्स तिकीट बूकींगला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिकच्या रिपोर्टनुसार आतापर्यत अॅनिमलचे १ लाख ११ हजार ३१७ तिकीट बूक झाले आहेत. ज्यातून ३.४ कोटींचे ओपनिंग मिळेल असे सांगितले जात आहे.

हिंदी अॅडव्हान्स बूकींग - ३ कोटी ०६ लाख ३६६ रुपये

तेलुगू अॅडव्हान्स बूकींग - ३३ लाख ८० हजार ७६२ रुपये

तमिळ अॅडव्हान्स बूकींग - १३ हजार ५१० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet Meeting: सिडको आणि म्हाडाच्या प्रकल्पांसाठी नवीन धोरण तयार करणार अन्...; महायुती मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय

Post-COVID Diabetes Surge: कोरोनानंतर आरोग्याचे नवे संकट; बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांत वाढ

Latest Marathi Breaking News: जळगावात भाजपाचे तीन सदस्य बिनविरोध विजयी

Sangli Politics: ईश्वरपूरमध्ये उमेदवारीचा पाऊस! ३० जागांसाठी तब्बल २७२ अर्ज; नगराध्यक्षपदासाठी १४ दिग्गज रिंगणात

Sangli politics: आटपाडीत उमेदवारीची झुंबड! २२ नगराध्यक्ष आणि १९७ नगरसेवक अर्जांनी पहिल्याच निवडणुकीची रंगत वाढवली

SCROLL FOR NEXT