Anjali Arora Trolled Again Anjali Arora Trolled Again
मनोरंजन

Anjali Arora Trolled Again : अंजली पुन्हा ट्रोल; तिरंगा फडकवल्यानंतर युजर म्हणाले...

व्हिडिओमध्ये परिधान केलेल्या आउटफिटमुळे अंजलीला ट्रोल करण्यात आले आहे

सकाळ डिजिटल टीम

Anjali Arora Trolled Again कंगना राणावतने होस्ट केलेल्या ‘लॉकअप शो’चा एक भाग असलेली अंजली अरोरा अलीकडेच चर्चेत होती. प्रथम तिचा एक एमएमएस समोर आला. ज्यामध्ये दिसलेली मुलगी अंजली अरोरा (Anjali Arora) असल्याचे सांगण्यात आले. नंतर अंजली अरोराने सोशल मीडियावर याबाबत स्पष्टीकरण दिले आणि व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी अंजली नसल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तिचे आणखी काही व्हिडिओ समोर आले ज्यावर तिला खूप ट्रोल करण्यात आले.

आता अंजली अरोराचा (Anjali Arora) एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती स्वातंत्र्यदिनी तिरंगा फडकवताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये परिधान केलेल्या आउटफिटमुळे अंजलीला ट्रोल करण्यात आले आहे. व्हिडिओमध्ये अंजली अरोरा पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि लो कमर जीन्स घातलेली दिसत आहे. तिरंगा (Indian Flag) धरलेला अंजली अरोराचा व्हिडिओ प्रचंड शेअर केला जात आहे. तसेच तिला खूप ट्रोल केले जात आहे.

कमेंट सेक्शनमध्ये एका यूजरने लिहिले की, तिरंगा नाही तर स्वतःला दाखवत आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, हा भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. एका युजरने लिहिले, हे दाखवण्यासाठी केले जात आहे.

लॉकअप शोचा एक भाग असलेल्या अंजली अरोरा हिने शो दरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले होते. शोमध्ये कंगना राणावतसोबत संभाषण करताना अंजली अनेकदा भावूकही झाली होती. या शोमध्ये तिने बराच पल्ला गाठला असला तरी या शोचा विजेता मुनावर फारूकी होता. हा शो वादांमुळे खूप चर्चेत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diesel Purchase Limit India : मोदी सरकारचा मोठा निर्णय ! डिझेल विक्रीवर मर्यादा; एका व्यक्तीला मिळणार फक्त 'इतके' डिझेल

घरच्यांचा विरोध झुगारून केलं प्रेमविवाह! पद्मिनी कोल्हापूरेचा भन्नाट लव्हस्टोरी

Latest Marathi News Live Update : बुलढाणा जिल्ह्यातील चिखला काकडमध्ये छ. शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वादाची ठिणगी

Interview : "हा निव्वळ योगायोग" गव्हर्नर सिनेमावर दिग्दर्शक चिन्मय मांडलेकर व्यक्त; "मनोज बाजपेयींमुळे ही संधी मिळाली "

Pune Metro: हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोची धावपळ; १५ जुलैपूर्वी कामे पूर्ण करण्यासाठी कसरत, अपूर्ण कामांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न?

SCROLL FOR NEXT