Fans Dispute Erupts at Ankit Tiwari’s Bihar Concert Last Night esakal
मनोरंजन

Ankit Tiwari : प्रसिद्ध संगीतकार, गायक अंकित तिवारीच्या कॉन्सर्टमध्ये युवतींचा राडा, हाणामारीचा Video Viral!

अंकित तिवारीच्याबाबत एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे.

युगंधर ताजणे

Fans Dispute Erupts at Ankit Tiwari’s Bihar Concert Last Night!: बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक, संगीतकार अंकित तिवारीची गोष्टच काही और आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून तो लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. आशिकी २ पासून त्याची गाडी सुसाट सुटली ती थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. आता तर त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टला मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. (लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर... फॉलो करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक)

अंकित तिवारीच्याबाबत एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. बिहारमधील एका शहरात त्याचा कॉन्सर्ट होता. त्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर गर्दीही झाली होती. याचवेळी अंकितचे स्वागत करण्यासाठी जमलेल्या महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून अंकितच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

Also Read - Penny Stocks : जादा नफ्याच्या मृगजळामागं धावणं नकोच!

विरल भयानीनं त्याच्या इंस्टावरुन हा व्हिडिओ शेयर केला असून काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या व्हिडिओला आतापर्यत हजारो व्ह्युज आले आहेत. त्यावर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया देखील भन्नाट आहेत. एकानं लिहिलं आहे की, असं स्वागत जर होणार असेल तर अंकित गायचं सोडून पळून जाईल. दुसऱ्यानं लिहिलं आहे की, हे सगळं नेमकं कशासाठी, काय प्रकार आहे हा...अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून या कॉन्सर्टची तयारी सुरु होती. आता त्यात घडलेल्या या प्रकारानं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कित्येकांनी त्यावरुन नाराजी देखील व्यक्त केली आहे. यापूर्वी कित्येक बॉलीवूड गायकांच्या कॉन्सर्ट दरम्यान असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. यावेळी पोलीस बंदोबस्त असून देखील त्यांच्यावर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT