मनोरंजन

Pavitra Rishta 2 Teaser: मानव-अर्चनाचा रोमॅंटिक अंदाज

अंकिता लोखंडेने या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.

प्रियांका कुलकर्णी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिका पवित्र रिश्तामधील मानव आणि अर्चना या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या मालिकेत दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) याने मानवची तर अभिनेत्री अंकिता लोखंडेने (Ankita Lokhande) अर्चनाची भूमिका साकारली होती.'पवित्र रिश्ता' (Pavitra Rishta) या मालिकेला 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता या मालिकेचा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिझनचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. अंकिताने हा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रोमोमध्ये अंकिता पुन्हा अर्चनाच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून मानवच्या भूमिकेत अभिनेता शाहिर शेख दिसत आहे.

अंकिताने या मालिकेचा प्रोमो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, 'लव्ह तो होगा ही ना इन द एअर, जब मानव और अर्चना आर देअर. त्यांच्या प्रवासामध्ये सहभागी व्हा. पवित्र रिश्ता, लवकरच #ZEE5 वर'. शाहिरने देखील प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, 'एकमेकांसाठी खास असणाऱ्या दोन सामान्य लोकांची गोष्ट...'. या मालिकेची निर्माती एकता कपूरने पवित्र रिश्ता 2 ची घोषणा केली होती.

उषा नाडकर्णी आणि अभिज्ञा भावे हे मराठी कलाकार पवित्र रिश्ता-2 मध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी अंकिताने या मालिकेच्या शूटिंग दरम्यानचे फोटो आणि व्हि़डीओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. शाहिरसोबतचा फोटो शेअर करू अंकिताने त्याला कॅप्शन दिले होते, 'काही लव्ह स्टोरी या विलक्षण असतात. मानव आणि अर्चनाच्या या विलक्षण लव्हस्टोरीची मी साक्षीदार आहे, याचा मला आनंद आहे. पवित्र रिश्ता-2 लवकरच तुमच्या भेटीस येणार आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT