sushant ankita 
मनोरंजन

"सुशांतसोबत लग्न करण्यासाठी मी मोठे चित्रपट नाकारले"; अंकिताचा खुलासा

स्वाती वेमूल

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे हे २०१६ पर्यंत एकमेकांना डेट करत होते. 'पवित्र रिश्ता' या मालिकेपासून या दोघांचं अफेअर सुरु झालं आणि सुशांत-अंकिता टेलिव्हिजन विश्वातील सर्वांत चर्चेतली जोडी ठरली. ब्रेकअपनंतरही अंकिता सुशांतच्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. जून २०२० मध्ये सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने त्याच्या कुटुंबीयांना साथ दिली आणि सुशांतला न्याय मिळावा यासाठी तिने पाठपुरावा केला. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने सुशांतसाठी मोठमोठे चित्रपट सोडल्याचा खुलासा केला. शाहरुख खानसोबत 'हॅपी न्यू इअर' आणि संजय लीला भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी', 'रामलीला' यांसारखे चित्रपट गमावल्याचं तिने सांगितलं. 

'बॉलिवूड बबल'ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली, "मी बऱ्याच गोष्टींना गमावलं. फराह खानने मला हॅपी न्यू इअर चित्रपटाची ऑफर दिली होती आणि त्यासाठी मी शाहरुख सरांना पण भेटले होते. पण त्यावेळी मी सुशांतचा विचार करत होते. माझ्यापेक्षा जास्त चांगलं त्याचं होऊ दे असं मला त्यावेळी वाटत होतं. मला आजही त्या गोष्टींचा पश्चात्ताप होत नाही. मला सुशांतचं करिअर घडवायचं होतं आणि मी ते माझ्या परीने केलं. सुशांतच्या पाठीशी मला खंबीरपणे उभं राहायचं होतं आणि तेसुद्धा मी केलं. ब्रेकअपनंतर मला माझी खरी किंमत समजली. तेव्हा स्वत:साठीसुद्धा काहीतरी करायची इच्छा होऊ लागली."

अंकिताने संजय लीला भन्साळींसारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी गमावली होती. याविषयी ती पुढे म्हणाली, "मला आठवतंय, संजय सरांनी मला कॉल केला होता आणि म्हणाले, बाजीराव मस्तानी चित्रपटात काम कर नाहीतर तुला पुढे जाऊन खूप पश्चात्ताप होईल. त्यावेळी मी लग्नाचं कारण देत नकार दिला. त्यावेळी मला हे बोलताना काहीच वाटलं नव्हतं. पण करिअर आणि खासगी आयुष्यात समतोल कसा राखावा हे मला आज समजतंय."

२०१९ मध्ये अंकिताने 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती 'बागी ३' या चित्रपटातही झळकली. यामध्ये तिने रितेश देशमुखच्या पत्नीची भूमिका साकारली होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: मुंबईत एन्फ्लुएन्झा, डेंग्यूच्या रूग्ण संख्येत वाढ

SCROLL FOR NEXT