Ankita Lokhande shared video Actress Celebrates International Yoga Day With Her Family sakal
मनोरंजन

Ankita Lokhande Yoga: अभिनेत्री अंकिता लोखंडेची योग दिनी खास झलक! व्हिडिओ व्हायरल..

अंकिताने कुटुंबासोबत साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस!

नीलेश अडसूळ

Ankita Lokhande yoga video: अभिनेत्री अंकिता लोखंडेचे योगाबद्दलचे प्रेम सगळ्यांना माहीत आहे. सोशल मीडिया वर ती नेहमीच योगा , वर्कआऊट व्हिडिओ टाकत असल्याने तिची फिटनेस बद्दल ची आवड सगळ्यांना माहीत आहे.

शरीर आणि मन दोन्ही हेल्दी ठेवण्यासाठी अंकिता योगा करते आणि अनेकांना प्रेरित करते. आजच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून तिने काहीतरी अनोख्या तऱ्हेने हा दिवस साजरा केला आहे बघू या याची एक खास झलक !

(Ankita Lokhande shared video Actress Celebrates International Yoga Day With Her Family)

अंकिताने कुटुंबासोबत दोन योगासने करतानाचा व्हिडिओ सोशल मीडिया वर पोस्ट केला आहे. तिने या पोस्टला कॅप्शन दिले आहे की, " किती कमाल अनुभव..'' शिवाय योगा केल्याने मन आणि शरीर दोन्ही सकारात्मक राहतं, असं अंकिता सांगते.

यावेळी व्हिडिओ मध्ये दिसत आहे की तिचं संपूर्ण कुटुंब योगा करत आहे. सोबत तिचा पाटील विकेक जैन देखील आहे. योग दिनी कुटुंबासोबत योगा केल्याने अनेकांनी तिचे कौतुकही केले आहे.

अंकिता लोखंडे सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिच्या वर्कआउट व्हिडिओ पोस्ट तर करते पण यातून तिची फिट राहण्याची आवड देखील समजते.

अंकिता लवकरच रणदीप हुडासोबत 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला होता, या टीजरने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: देशाचा आर्थिक विकास पण श्रीमंत-गरीबांमधील दरी वाढत आहे, मोहन भागवातांनी व्यक्त केली चिंता

Gandhi Jayanti 2025: विद्यार्थ्यांनी गांधीजींच्या 'या' ७ शिकवणीतून अवश्य घ्यावे अमूल्य धडे

Dasara 2025 Vastu Tips: दसऱ्याला 'या' वस्तू उधार घेतल्याने होतो वास्तू दोष, जाणून घ्या

'देश मनुस्मृती नव्हे, तर भीम स्मृती म्हणजेच संविधानानुसार चालेल'; वाजपेयींचा उल्लेख करत RSS च्या मेळाव्यात काय म्हणाले माजी राष्ट्रपती?

Dussehra Melava 2025 Live Update : आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, स्वदेशी स्वीकारावं लागेल - सरसंघचालक मोहन भागवत

SCROLL FOR NEXT