Amrita Rao with husband RJ Anmol and son Veer during a puja.  Google
मनोरंजन

किसिंग सीन देण्यावरनं 'विवाह' फेम अमृता रावला नवऱ्याचा अजब सल्ला

अमृता राव सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दूर मातृत्वाचा आनंद घेत आहे.

प्रणाली मोरे

'विवाह' (Vivah)फेम अमृता राव(Amrita Rao) आज भले बॉलीवूड(Bollywood)मध्ये सक्रिय नसली तरी तिनं जे काही हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढे सिनेमे केलेयत त्यामुळे ती आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 'विवाह' फेम अमृता रावनं नुकतेच सिनेइंडस्ट्रीतील आपल्या करिअरविषयी एक मोठा खुलासा केला आहे. तिनं त्यात म्हटलं आहे,''मी पडद्यावर किसिंग सीन देण्यासाठी कम्फर्टेबल नव्हते त्यामुळे खूप मोठ्या सिनेमांना मला नकार द्यावा लागला. त्यावेळी आर.जे अनमोल यानं माझी समजूत काढत यातनं काही मार्ग काढता येईल का ते पाहिलं. आणि नंतर सरळ मला म्हणाला,सिनेमात काम करणं सोड आणि माझ्याशी लग्न कर सरळ. त्याच्या त्या निर्णयानं मी गोंधळले होते त्यावेळी. पण नंतर त्यानं त्या थेट वक्तव्याबद्दल माझी माफी मागितली''.

अमृतानं २००२ मध्ये 'अब के बरस' सिनेमातनं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. सुरज बरजात्या दिग्दर्शित 'विवाह' हा सिनेमा तिचा सर्वात लोकप्रिय सिनेमा ठरला होता. या सिनेमात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. त्यानंतर अमृतानं 'मै हू ना','जॉली एल.एल.बी' असे काही मोजके बॉलीवूड सिनेमे केले. २०१९ मध्ये अमृतानं 'ठाकरे' सिनेमातही काम केलं होतं. या सिनेमात तिनं मीनाताई ठाकरे म्हणजे बाळासाहेबांच्या पत्नीची भूमिका साकारली होती.

आपला नवरा आर.जेअनमोलनं फिल्म इंडस्ट्री सोडायला सांगितली यावर खुलासा करताना अमृता म्हणाली,''अनमोल पाहत होता मी किसिंग सीन देणार नाही या अटीखाली कितीतरी मोठ्या सिनेमांना नकार कळवतेय. मी कम्फर्टेंबल नाही तशा सीनना हे त्याला कळत होतं. तेव्हा त्याला वाटलं की ही योग्य वेळ आहे की मी माझं आयुष्य जगावं,स्वतःला वेळ द्यावा,लग्न करावं. त्यानं मला फिल्म लाईन सोडायला सांगितली आणि मी तेव्हा अक्षरशः गोंधळून गेलेल्या मनःस्थितीत होते. पण नंतर त्यानं माफी मागितली माझी आणि तो तसं का बोलला यामागचं कारणही समजावून सांगितलं''.

अमृतानं आर जे अनमोल(R J Anmol) सोबत लग्न केल्यावर ती आता एका मुलाची आई बनली आहे. सध्या ती तिचं मातृत्व एन्जॉय करत आहे. तिनं गेल्या तीन-चार वर्षात एकही सिनेमा केलेला नाही. अमृतानं २०१४ मध्ये अनमोलसोबत लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाची बातमी खूप दिवसानंतर मीडियाला कळाली होती. अमृताच्या करिअरवर लग्नाचा काही परिणाम होऊ नये म्हणून लग्नाबाबत गुप्तता पाळली होती असं आर.जे अनमोलनं एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

Satara Politics:'भाजपचा सातारा नगरपालिकेत महाविकास आघाडीला दणका'; आशा पंडित बिनविराेध विजयी..

Kolhapur Election: कोल्हापुरात निष्ठेला तिलांजलि, संधिसाधू राजकारणाची परंपरा जुनीच; मुश्रीफ-घाटगे युतीमुळे पुन्हा चर्चा

SCROLL FOR NEXT