Winner Sakal
मनोरंजन

'भट्टी' : भांडवलशाही अन् उपेक्षित कामगारांचे वास्तववादी दर्शन

पाचव्या आण्णाभाऊ साठे शॉर्ट फिल्म महोत्सवात भट्टी या शॉर्ट फिल्मची आणि '२ चाक ४३५ दिवस' या माहितीपटाची वर्णी

दत्ता लवांडे

पुणे : देशभरातील असंख्य उपेक्षित कामगारांच्या प्रश्नाचं वास्तव दाखवणारा भट्टी हा लघुपट. कामगारांची आर्थिक पिळवणूक, शारिरीक छळ या असंख्य भांडवलशाही संकटांना सामोरं जाऊन आपलं जीवन जगणाऱ्या भट्टी कामगाराच्या जीवनाचं वास्तव शिवाजी करडे यांनी आपल्या 'भट्टी' या लघुचित्रपटात दाखवलंय. या लघुपटाला पाचव्या आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट शॉर्ट फिल्मचा अवॉर्ड मिळालाय. त्याचबरोबर '२ चाक ४३५ दिवस' या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. हा महोत्सव राष्ट्रीय फिल्म संग्रहालय पुणे येथे पार पडला.

(Annabhau Sathe International Short Film Festival)

'भट्टी' या लघुपटाचे दिग्दर्शक शिवाजी करडे हे असून त्यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचाही पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर उत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा पुरस्कार मिळालेल्या '२ चाक ४३५ दिवस' या माहितीपटाचे गणेश धोत्रे हे दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर बेस्ट स्क्रीनप्ले (पटकथा) हा अवॉर्ड मनोज भांगे यांच्या 'बेलोसा' या लघुपटाने पटकावला आहे. 'डोब्या' या लघुपटाला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच अभिनेते शरद जाधव यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.

भांडवलशाहीतून कामगारांचा दाबला जाणारा आवाज आणि आर्थिक पिळवणूक या वास्तवाचं दर्शन शिवाजी करडे यांनी आपल्या लघुपटातून घडवलं आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा, झाडे लावण्याचा, महिला सबलीकरणाचा संदेश देत सायकलवर ४३५ दिवस महाराष्ट्र दौरा करणाऱ्या प्रणाली चिकटे यांच्या प्रवासावर आधारित '२ चाक ४३५ दिवस' हा माहितीपट गणेश धोत्रे यांनी बनवला आहे.

आण्णाभाऊ साठे शॉर्ट फिल्म फेस्टिवलचे आयोजक सचिन बगाडे आणि दिग्दर्शक संदीप ससाणे हे आहेत. या महोत्सवासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेते अमर देवकर, अभिनेते किरण माने, शरद जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

महोत्सवाचा निकाल

  • सर्वोत्कृष्ट लघुपट - भट्टी

  • सर्वोत्कृष्ट माहितीपट - २ चाकं ४३५ दिवस

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - शिवाजी करडे (भट्टी)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा - मनोज भांगे (बेलोसा)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - शरद जाधव (भट्टी)

  • सर्वोत्कृष्ट छायाचित्रण - विशाल लौकिक (डोब्या)

  • सर्वोत्कृष्ट संकलन - सनत गाणू (शिमगा)

  • सर्वोत्कृष्ट बालकलाकार - सह्याद्री माचटेगावकर (बेलोसा)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - पियुष शहा (शिमगा)

  • सर्वोत्कृष्ट परिक्षक लघुपट - घुम्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : : लालबागचा राजा गिरगावमध्ये दाखल

Lalbaugcha Raja: हिंदु-मुस्लिम ऐक्याचा संदेश! लालबागचा राजा मशिदीजवळ पोहोचतो तेव्हा...; पाहा ऐतिहासिक क्षणाचा खास व्हिडिओ

उत्साहाला गालबोट! पुण्यात ४ तर शहापूरमध्ये ५ जणांचा मृत्यू, कोल्हापूरसह सांगलीत मिरवणुकीत वाद... विसर्जनादरम्यान कुठं काय घडलं?

Crime: मित्रासाठी सापळा रचला, पण स्वत:च अडकला; आरडीएक्ससह दहशतवादी हल्ला करणार असल्याचा कॉल तरुणाने का केला? सत्य समोर

Ohh Shit... टीम इंडियाचा फॉर्मात असलेला फलंदाज लंगडताना दिसला, तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह! Asia Cup पूर्वी वाढली डोकेदुखी

SCROLL FOR NEXT