Answer to Rs 50 lakh question that made Lucknows Farhat Naz quit 
मनोरंजन

बेगम हजरत महल यांचे खरे नाव काय ?; 50 लाख गेले ना भाऊ

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची गंमतच वेगळी आहे. काही वेळातच तुमचे नशीब बदलवण्याची क्षमता असणा-या शो मध्ये हजाराचे लाख करणारे आहेत तसे काही लाखाचे बारा हजार करणारेही आहेत. अर्थात जवळच्या सगळ्या लाईफ लाईन संपल्या असतील तर काय करणार ? असे बरेच प्रसंग या शो मध्ये पाहायला मिळतात. रायबरेली येथे राहणा-या फरहत नाज यांना अशाच एका प्रश्नाला सामोरे जावे लागले. त्या प्रश्नाचे उत्तर दयायला काही त्यांना जमले नाही.

 बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या लक्षवेधी  सूत्रसंचालनाने केबीसीला एक वेगळे स्थान प्राप्त झाले आहे. सध्या केबीसीचा १२ वा सीझन आहे. विशेष म्हणजे शोमध्ये हॉटसीटवर बसणारे स्पर्धक नेहमीच चर्चेत असतात. यात रायबरेली येथे राहणाऱ्या फरहत नाज सहभागी झाल्या होत्या. त्यांनी २५ लाख रुपये जिंकले. त्यांना ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर त्यांची गाडी अडली. त्या प्रश्नाचे उत्तर त्य़ांना देता आले नाही. यामुळे त्यांना 50 लाख गमवावे लागले आहे.

२० ऑक्टोबर रोजी फास्टेस्ट फिंगर फर्स्टमध्ये विजयी झालेल्या फरहत या हॉट सीटवर येऊन बसल्या. त्यांनी  २५ लाख रुपये जिंकले. पण ५० लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला. १८५७च्या उठावादरम्यान लखनऊचे नेतृत्व करणाऱ्या बेगम हजरत महल यांचे खरे नाव काय होते? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यासाठी A. बीबी मुबारिका, B. मेहर-इन-निसा, C. सिकंदर जहान आणि D. मोहम्मदी खानम हे पर्याय देण्यात आले होते. या प्रश्नावर बराच वेळ विचार करुन फरहत यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर त्यांनी खेळ सोडताना ‘बीबी मुबारिका’ असे या प्रश्नाचे उत्तर वाटत असल्याचे सांगितले. पण त्या उत्तरावर ठाम नसल्यामुळे त्यांनी क्विट होण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे योग्य उत्तर होते, मोहम्मदी खानम. हे उत्तर ऐकल्यानंतर फरहत यांना गेम आपण गेम क्विट केला याचे समाधान वाटले. रायबरेलीत राहणा-या 41 वर्षीय फरहात नाझ या शिक्षिका असून त्यांनी त्या भागातील मुलांच्या शैक्षणिक प्रश्नांवर काम केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT