मनोरंजन

'अंतिम: द फाइनल ट्रुथ' मधील 'विघ्नहर्ता' पाहिलायं?

बॉलीवूडच्या भाईजानचा आगामी चित्रपट अंतिम द फायनल ट्रुथचं पोस्टर अनावरण करण्यात आलं होतं.त्यानंतर

युगंधर ताजणे

बॉलीवूडच्या भाईजानचा आगामी चित्रपट अंतिम द फायनल ट्रुथचं पोस्टर अनावरण करण्यात आलं होतं.त्यानंतर आता त्याच्या टीझरचे अनावरण करण्यात आले आहे. त्यालाही चाहत्यांचा मोठा प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. आता 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'च्या 'विघ्नहर्ता' या पहिल्या गाण्याच्या टीजरचे अनावरण करण्यात आले आहे. विघ्नहर्ता हे गाणे ऊर्जा आणि भव्यता असलेले एक परिपूर्ण फेस्टिवल सॉन्ग आहे. गणपती उत्सवाचे सार या टीजरमध्ये सामावले असून हा टीझर म्हणजे हा ट्रॅक कसा आहे याची परफेक्ट झलक आहे. गाण्याच्या या अनोख्या टीजरसोबत चित्रपटाबाबतचा उत्साह आधी पेक्षा अनेक पटीने वाढला आहे.

या छोट्याशा टीजरमधून, आपल्याला सलमान खान आणि आयुष शर्मानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 'अंतिम: द फाइनल ट्रुथ'मध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार असून हा चित्रपट सलमान खान फिल्म्स द्वारा प्रस्तुत आणि सलमा खान यांच्याद्वारे निर्मित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. बॉलीवूडमध्ये (bollywood) ज्या अभिनेत्याच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत असतात असा अभिनेता म्हणजे सलमान खान. (salman khan_ त्याच्या चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचा राधे द मोस्ट वाँटेड भाईजान नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अर्थात त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सलमानच्या मुव्हिजला ज्या प्रमाणात ओपनिंग मिळते तसा त्याच्याबाबत उत्साहही नव्हता.

सलमानच्या वडिलांना देखील त्याचा हा चित्रपट फारसा आवडला नसल्याच्या बातम्या यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होता. त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास, तो आता टायगरच्या तिसऱ्या भागात दिसणार आहे. याशिवाय त्याच्याकडे आणखी तीन महत्वाचे चित्रपट आहेत. मात्र त्यासगळ्यात चर्चा आहे त्याच्या अंतिम द फायनल ट्रुथ (antim the final truth) या चित्रपटाची. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. काही दिवसांपासून त्यांच्या या चित्रपटाची चर्चा आहे. गणेश चतुर्थीपूर्वीच सलमाननं आपल्या चाहत्यांना एक वेगळ्या प्रकारचं गिफ्ट दिलं आहे. अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या पोस्टरमध्ये सलमान खान आणि आयुष शर्मा हे दोन अभिनेते एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यांच्याकडे पाहून ते युद्धाच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. त्या दोघांच्या लूकचं मोठ्या प्रमाणावर कौतूक होत आहे. सलमानच्या अशाप्रकारच्या लूकचं त्याचे चाहते नेहमीच उत्साहानं स्वागत करत असल्याचे पाहायला मिळते. पोस्टरचे डिजाइन लक्षवेधी आहे. त्यात दोन प्रमुख व्यक्तिरेखांचा संघर्ष दिसून येतो. चित्रपट ‘अंतिम’चे कथानक मुख्यत्वे करून पोलीस आणि वेगवेगळ्या विचारधारांचे गैंगस्टर यांच्या आसपास फिरते. दोन नायक असलेला हा चित्रपट, ‘अंतिम’ पूर्णपणे दोन वेगवेगेळी विश्व आणि विचारधारांच्या दोन नायकांमधील संघर्षाला समोरा-समोर आणते, ज्यातून एक भयकंपित आणि अंगावर काटा आणणारं चित्रण या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो पहिल्यांदाच सलमानसोबत दिसणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT