anupam kher and kirron kher wedding anniversary : anupam shared old photo of kirron kher and his marriage  sakal
मनोरंजन

सहजीवनाची ३७ वर्ष! अनुपम खेर यांनी शेअर केला लग्नाचा तो फोटो, म्हणाले..

अनुपम खेर आणि किरण खेर यांच्या लग्नाला आज ३७ वर्षे पूर्ण झाली.

नीलेश अडसूळ

anupam kher and kirron kher wedding anniversary : बॉलीवूड अनुपम खेर आणि अभिनेत्री किरण खेर (kiron kher) यांचे नाटक, चित्रपट आणि एकूणच मनोरंजन क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांनी आजवर अनेक कलाकृतींमधून आपल्या दमदार अभिनयाची मोहर उमटवली. ज्याप्रमाणे त्या दोघांच्या कामाचे कौतुक केले जाते. त्याप्रमाणेच त्या दोघांच्या जोडीचेहि कौतुक केले जाते. बॉलीवुडमधील ते सर्वात लोकप्रिय कपल आहे. आज २६ ऑगस्ट रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. गेली ३७ वर्षे ते एकमेकांचे जीवनसाथी आहेत. आज लग्नाच्या वाढदिवासानिमित्त अनुपम खेर (anupam kher) यांनी एक सुंदर आठवण आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर शेयर केली आहे. (anupam kher and kirron kher wedding anniversary : anupam shared old photo of kirron kher and his marriage)

किरण आणि अनुमप यांची लव्हस्टोरीही अगदी खास आहे. त्यांनी आपले पहिले संसार मोडून एकमेकांचा हात धरला. आधी एकमेकांचे जवळचे मित्र आणि मग जीवनसाथी असा हा प्रवास अगदी मोहून टाकणारा आहे. चंदीगढला असताना एका नाटकाच्या निमित्ताने किरण आणि अनुपम यांची भेट झाली. किरणसुद्धा त्या वेळी नाट्यक्षेत्रात सक्रिय होत्या. २६ ऑगस्ट १९८५ रोजी दोघांनी लग्न केले. आज त्यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली. अनुपम वारंवार आपल्या बायकोविषयी म्हणजेच किरण विषयी बोलत असतात. आजही त्यांनी एक खास आठवण शेयर केली आहे. (kirron kher and anupam kher lovestory)

अनुपम यांनी लग्नातला एक जुना फोटो शेयर केला आहे. दोघांच्या आयुष्यातील अत्यंत गोड अशी ही आठवण आहे. गळ्यात वरमाला, लग्नाचा पारंपरिक पोशाख, फुलांच्या माळा असा अत्यंत पारंपरिक लग्नातील हा फोटो आहे. या फोटोसोबत अनुपम म्हणतात, ‘लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय किरण. अलिकडे शिमल्याला गेलेलो असताना माझ्या वडिलांनी जपून ठेवलेला ३७ वर्षांपूर्वीचा हा फोटो त्यांच्या ट्रंकमध्ये सापडला. देव तुला सुख, दिर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य देवो.’ असे cकॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Vanrang 2026: दुर्गम भागातील आदिवासी कलांना मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी मानाचं व्यासपीठ! 'वनरंग 2026'ला सुरुवात

Marathi News Live Updates : शेतातील झोपडीत रंगला जुगाराचा अड्डा, गुन्हे शाखेच्या छापा, नऊ जण ताब्यात

Kalamb Drugs Racket : कळंबच्या ड्रग्ज रॅकेटचा ‘किंगपिन’ कोण?; बीड-पुणे कनेक्शन पोलीस तपासात उघड, पुरवठादार, विक्रेते आणि सेवन करणारे पोलिसांच्या रडारवर

Pune Airport : सुरक्षित उड्डाणांसाठी ‘घार’ ठरतेय सर्वात मोठा अडथळा; हवाई दलाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग

SCROLL FOR NEXT