Anupam Kher esakal
मनोरंजन

Anupam Kher: अनुपम खेर यांनी वाढदिवशी चाहत्यांना दिलं सरप्राईज; आगामी चित्रपटाची केली घोषणा, सिनेमाचं नाव माहितीये?

Anupam Kher: नुकताच अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.

priyanka kulkarni

Anupam Kher: बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा आज वाढदिवस आहे. अनुपम खेर यांचे चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देत आहेत. अशताच आता अनुपम खेर यांनी वाढदिवशी चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकताच अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करुन आगामी चित्रपटाच्या नावाची घोषणा केली आहे.

अनुपम खेर यांनी शेअर केला व्हिडीओ

अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये अनुपम यांची आई देखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांच्या हातात आगामी चित्रपटाची स्क्रिप्ट दिसत आहे. या व्हिडीओला अनुपम खेर यांनी कॅप्शन दिलं, "आज माझ्या वाढदिवसाला मी माझ्या आगामी चित्रपटाची घोषणा करत आहे, या चित्रपटाचं मी दिग्दर्शन करणार आहे. काही कथा अशा असतात ज्या तुम्हाला जगासोबत शेअर करायच्या असतात. या चित्रपटाची सुरुवात मी आई दुलारीचा आशीर्वाद घेऊन केली आहे. मागील तीन वर्षांपासून मी या संगीतमय कथेवर काम करत आहे. अखेर उद्या म्हणजेच महाशिवरात्रीच्या शुभ दिनी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करत आहे. वाढदिवस हा स्वतःला आव्हान देण्याचा सर्वोत्तम दिवस आहे. तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत असूद्या, ओम नमः शिवाय!"

अनुपम यांनी सोशम मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी त्यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ:

आगामी चित्रपटाचं नाव

अनुपम खेर यांच्या आगामी चित्रपटाचं नाव 'तन्वी द ग्रेट' असं आहे. जवळपास 22 वर्षानंतर अनुपम खेर हे दिग्दर्शनात कमबॅक करणार आहेत. 2002 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ओम जय जगदीश' या चित्रपटाचं दिग्दर्सन अनुपम खेर यांनी केलं. या चित्रपटात अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन यांनी काम केलं आहे.

काही महिन्यांपूर्वी अनुपम खेर यांचा कागज-2 हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात दर्शन कुमार, नीना गुप्ता यांनी काम केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : आमदाराला महिलेच्या नावे हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, २५ वर्षीय तरुणाला त्यांच्याच मतदारसंघातून अटक

Jalgaon Gold Price : जळगाव सुवर्ण बाजारात उच्चांक! चांदीने ओलांडला १ लाख ७० हजारांचा टप्पा; सोन्यातही मोठी वाढ

Latest Marathi News Live Update : पोलीस दलातील हवालदार छापत होता बनावट नोटा, पोलिसांची कारवाई

एक मिस युनिव्हर्स तर दुसरे अँग्री यंग मॅन; ऐश्वर्या राय की अमिताभ बच्चन, दोघांमध्ये कुणाची संपत्ती जास्त आहे?

Rahul Gandhi : राहुल गांधींसाठी नोबेल पुरस्काराची मागणी? काँग्रेस नेत्याच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण!

SCROLL FOR NEXT