Anupam Kher latest news
Anupam Kher latest newsesakal

Anupam Kher Birthday : लोकांना सतत हसरं ठेवणाऱ्या अनुपम यांना करावा लागला नैराश्याचा सामना! कशी घेतली भरारी?

चार दशकांहून अधिक काळ अनुपम खेर (Anupam Kher Birthday) यांनी त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
Published on

Anupam Kher Birthday News : बॉलीवूडमधील ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका निभावल्या तेवढ्या भूमिका (Anupam Kher Viral News) करणारे दुसरे अभिनेते बोटावर मोजण्या एवढे असतील. वयाची ६८ वर्षे पूर्ण करणारे अनुमप हे आज त्यांचा ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी बर्थ डे च्या पूर्व संध्येला शेयर केलेली पोस्टही चर्चेत आली होती.

अनुपम यांनी तीनशे हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले असून (Anupam Kher Birthday) लोकप्रियतेच्या बाबत ते नेहमीच आघाडीवर राहिले असतील. चित्रपट असो वा नाटक किंवा टीव्ही मनोरंजन यात त्यांनी आपल्या अभिनयाची ओळख निर्माण केली आहे. त्यांचा दरारा मोठा आहे. एक प्रभावी व्यक्तिमत्व म्हणूनही ते नेहमीच चर्चेत राहिले आहे. या सगळ्यात आणखी एक विशेष बाब म्हणजे तब्बल चार दशकांहून अधिक काळ बॉलीवूडमध्ये सक्रिय असुनही ते एकदाही वादाच्या भोवऱ्यात अडकले नाहीत.

अनुपम यांचे इंडस्ट्रीमध्ये खूप सारे मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वानं साऱ्यांना जिंकून घेतले आहे. नवोदित कलाकारांना सतत प्रोत्साहन देणे, त्यांच्याशी संवाद साधणे, पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावून तरुण कलाकारांना मार्गदर्शन करणे, सोशल मीडियावर सामाजिक जाणीवा समृद्ध करणारे व्हिडिओ पोस्ट करणे यामुळे अनुपमजी चर्चेत राहिले आहेत. नेटकऱ्यांनी देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते नवोदित कलाकार रणबीर कपूर पर्यत यांच्यापर्यत शेकडो कलाकारांसोबत काम करणाऱ्या अनुपम खेर यांचा जीवनप्रवास हा काही सोपा नव्हता. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीमध्ये आपण फार मोठ्या संघर्षातून वेगळी वाट तयार करत इथपर्यत आलो असल्याचे म्हटले आहे. नाटकांपासून झालेली सुरुवात, सारांश या चित्रपटानं दिलेली ओळख त्यानंतर विनोदी, गंभीर, क्राईम, सामाजिक, राजकीय सारख्या विषयांवरील कलाकृतींमध्ये अनुपमजींचा समावेश राहिला आहे.

Anupam Kher latest news
Anupam Kher Birthday : 'मार्चमध्ये जन्माला येणारी सगळी लोकं....' अनुपम खेर यांच्या व्हिडिओवर कंगना बोललीच!

नैराश्याचा सामना करावा लागला होता..

एका मुलाखतीमध्ये अनुपम खेर यांनी त्यांना कराव्या लागलेल्या नैराश्याच्या गोष्टींविषयी सांगितलं होतं. अनुपम खेर आणि नैराश्य असं म्हटल्यावर कदाचित खरं वाटणार नाही पण त्यांनाही नैराश्यानं ग्रासल्याचं त्यांनीच त्या मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

अनुपम यांनी म्हटलं होतं की त्यांना मॅनिक डिप्रेशननं गाठलं होतं. त्यावर त्यांनी ध्यानधारणा आणि उपचार घेत मातही केली होती. ती माझी लढाई होती. मलाच त्यावर विजय मिळवायचा होता. मी ती लढाई जिंकलो. काहीही झालं तरी निराश व्हायचं नाही. त्यानंतर अनुपम यांनी नेहमीच चाहत्यांना, लोकांना नैराश्यापासून कसे दूर राहता येईल याचे धडे दिलेत.

Anupam Kher latest news
Kangana Ranaut Post : 'मी कधीही कुणाच्या लग्नात नाचले नाही, माणसाचं सर्वात मोठं धन म्हणजे...' कंगनाची 'ती' पोस्ट नेमकी कुणासाठी?

अनुपम हे सोशल मीडियावर देखील नेहमीच अॅक्टिव्ह असणारे सेलिब्रेटी आहेत. त्यांच्या व्हायरल व्हिडिओला मिळणारा प्रतिसाद मोठा असतो. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईतील एका रस्त्यावर कंगवा विकणाऱ्या विक्रेत्याचा व्हिडिओ शेयर केला होता. त्या विक्रेत्याच्या जन्मदिनी त्यांनी त्याच्याकडून कंगवा घेत त्याला पाचशे रुपये दिले होते. अनुपम यांचा तो व्हिडिओ आणि त्यांनी त्यावर लिहिलेली पोस्ट चाहत्यांच्या कौतुकाचा विषय होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com