anupam kher emotional post on satish kaushik friendship day 2023  SAKAL
मनोरंजन

आज तुझी खुप आठवण.. फ्रेंडशिप डे निमित्त अनुपम खेरने काढली सतीश कौशीक यांची आठवण Friendship Day 2023

आज फ्रेंडशिप डे निमित्त अनुपम खेर यांनी सतीश कौशीक यांची आठवण जागवलीय

Devendra Jadhav

आज फ्रेंडशिप डे. 2023 मध्ये अनेकांना नवीन मित्र भेटले असतील. याशिवाय जुन्या मित्रांच्या मैत्रीची नव्याने जाणीव झाली असेल. अशातच बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्या मित्रांची आठवण जागवली आहेत.

अनुपम खेर यांनी सोशल मिडीयावर दोन फोटो शेअर केलेत. यात त्यांनी दिवंगत मित्र सतीश कौशीक यांची आठवण जागवलीय.

(anupam kher emotional post on satish kaushik friendship day 2023)

अनुपम खेरला आली सतीश कौशीक यांची आठवण

अनुपमने इंस्टाग्रामवर त्याचे मित्र- अनिल कपूर आणि सतीश कौशिक यांच्यासोबत फोटोंची एक सिरीज शेअर केली. या फोटोत अनुपम खेर, अनिल आणि सतीश हे त्रिकूट कॅमेऱ्याकडे हसत होते.

हे फोटो शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले, “हॅप्पी फ्रेंडशिप डे! आज सतीशला जरा जास्तच मिस करत आहे!”

अनुपम खेरच्या या पोस्टवर सोशल मिडीया युजर्सनी कमेंट करत सतीश - अनुपम - अनिल यांच्या मैत्रीचं कौतुक केलंय.

असा एकही दिवस नाही तेव्हा अनुपमला सतीशची आठवण येत नाही

ज्येष्ठ अभिनेते-चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशीक यांच्या निधनानंतर, असा कोणताही दिवस जात नाही की खेर यांना त्यांचा प्रिय मित्र सतीशची आठवण येत नाही. अनुपम अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतीश यांचे फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट करतो.

अनुपम खेर यांचं वर्कफ्रंट

अनुपम खेर यांच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचे झाले तर.. त्यांनी अलीकडेच कवी, तत्त्वज्ञ आणि निबंधकार, रवींद्रनाथ टागोर यांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. 24 ऑगस्टला या सिनेमाच्या नावाची घोषणा होईल.

शिवाय, अनुपम खेर दिग्दर्शक अनुराग बासूच्या आगामी 'मेट्रो...इन डिनो' या अँथॉलॉजी चित्रपटात दिसणार आहे.

या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, कोंकणा सेन शर्मा, पंकज त्रिपाठी, फातिमा सना शेख, अली फजल आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

29 मार्च 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय कंगना रणौतच्या आगामी 'इमर्जन्सी' सिनेमात सुद्धा अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भुमिकेत झळकणार आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT