Anupam Kher Injured on the set of 'Kaagaz 2' Google
मनोरंजन

'कागज २' च्या सेटवर अनुपम खेर जखमी, एका टेबलानं केला घात...

जखमी झाल्यावरही अनुपम खेर यांनी तात्पुरता इलाज करीत शूटिंग पुन्हा सुरु करण्याचं धाडस दाखवलं.

प्रणाली मोरे

'शो मस्ट गो ऑन' असं नेहमी म्हटलं जातं,याचं प्रत्यक्ष उदाहरण नुकतेच एका सिनेमाच्या सेटवर पहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी अभिनेता अनुपम खेर यांनी हा 'शो मस्ट गो ऑन'चा दाखला दिला. आपला आगामी सिनेमा 'कागज २'(Kaagaz 2) च्या सेटवर जखमी झाल्यानंतरही अनुपम खेर(Anupam Kher) यांनी आपलं काम सुरू ठेवलं. नेमकं काय घडलं अनुपम खेर यांच्यासोबत? (Anupam Kher Injured on the set of 'Kaagaz 2')

या घटनेशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की, कोर्टातील एका सीनचे शूटिंग सुरू होते,ज्यावेळी अनुपम खेर चुकून जखमी झाले. सूत्रांनी सांगितल्यानुसार कळत आहे की, हा एक महत्त्वाचा कोर्ट रुममधला सीन होता, आणि अनुपम खेर आपल्या भूमिकेत पू्र्ण दंग होते,परंतु जसं त्यांनी समोरील टेबलावर आपलं डोकं आपटलं,त्याचा परिणाम मात्र अभिनेत्याला भलताच महागात पडला.

ही घटना घडल्यानंतर,सर्व लोक अनुपम खेर ठीक आहेत ना हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या दिशेने धावत गेले. सूत्रांनी खुलासा केला आहे की, त्या सेटवर दर्शन कुमार आणि सतिश कौशिक देखील हजर होते आणि जेव्हा अनुपम खेर जखमी झाले तेव्हा प्रत्येकजण घाबरला. त्यावेळी प्रत्येक जण अनुपम खेर यांच्या जखमेतून फार रक्त वाहू नये याचीच प्रार्थना करत होता. पण देवाच्या कृपेने अनुपम खेर चांगले होते.

अनुपम खेर आपल्या डोक्याला सूज येऊ नये म्हणून लगेच आइसपॅकने शेकवायला लागले. निर्मात्यांनी त्यावेळी शूटिंग थांबवण्याचे आदेश दिले,कारण त्या दिवशी मुख्य सीन हा अनुपम खेर यांच्यावरच शूट केला जाणार होता. पण शूटिंग थांबवायवला अनुपम खेर तयार नव्हते. त्यांनी निर्मात्यांना,'फक्त आईसपॅक लावण्यापुरतं थांबा आणि मग पुन्हा शूटिंग सुरू करुया' असं सांगितलं.थोडया वेळानं थोडं बरं वाटल्यानंतर अनुपम खेर यांनी आजुबाजूचं गंभीर वातावरण हलक-फुलकं करण्यासाठी जोक मारायला सुरुवात केली. अनुपम खेर यांच्या या मनमिळावू स्वभावामुळे आज इंडस्ट्रीत अगदी सेट बॉय पासून बड्या कलाकारांपर्यंत सारेच त्यांचे मित्र आहेत. त्याची फ्रेंड लिस्ट बरीच मोठी आहे. अनुपम खेर आता ठीक असून उर्वरीत सिनेमाचं शूट करण्यात बिझी असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं.

थोडया वेळानं थोडं बरं वाटल्यानंतर अनुपम खेर यांनी आजुबाजूचं गंभीर वातावरण हलक-फुलकं करण्यासाठी जोक मारायला सुरुवात केली. अनुपम खेर यांच्या या मनमिळावू स्वभावामुळे आज इंडस्ट्रीत अगदी सेट बॉय पासून बड्या कलाकारांपर्यंत सारेच त्यांचे मित्र आहेत. त्याची फ्रेंड लिस्ट बरीच मोठी आहे. अनुपम खेर आता ठीक असून उर्वरीत सिनेमाचं शूट करण्यात बिझी असल्याचं देखील सूत्रांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT