Anupam Kher, Dulari Kher Google
मनोरंजन

''आई तु या जगातील सर्वात पुढारलेली महिला आहेस,दुलारी रॉक''- अनुपम खेर

सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून सांगितला यामागचा किस्सा...

प्रणाली मोरे

अनुपम खेर(Anupam Kher) यांचं आपल्या आईवर नितांत प्रेम आहे हे वारंवार दिसून आलंय. आपल्या शुटिंगच्या घाई-गडबडीतून वेळ काढत ते नेहमीच आईबरोबर वेळ घालवताना दिसतात. इतकंच नाही तर आईसोबतचे व्हिडीओही ते सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. आतापर्यंतच्या अनेक व्हिडीओतनं एक गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे अनुपम खेर यांची आईही मजा-मस्ती करणारी आहे. कधीतर ते व्हिडीओ पाहून असाही भास होतो की अनुपम खेर यांच्यातले विनोदाचे अचूक टायमिंग त्यांच्या आईकडूनच आले असावे. आज अनुपम खेर यांनी एक व्हिडीओ पोस्ट केलाय त्यातनं त्यांच्या आईची एक हटके बाजू समोर आलीय.

त्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकाल की अनुपम खेर आणि त्यांची आई एका कोच वर बसलेले आहेत आणि गप्पा मारीत आहेत. तेवढ्यात अनुपम खेर त्यांच्याआईला मोबाईलमध्ये आपला सावत्र मुलगा सिकंदर खेर याचा फोटो दाखवून म्हणतात की, सिकंदरने आपल्याला न सांगता परस्पर लग्न केले आहे. खरंतर अनुपम खेर आपल्या आईसोबत प्रॅंक करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पुढे त्यांची आई दुलारीनं दिलेलं उत्तर ऐकाल तर अनुपम खेर यांचा पोपट कसा झाला हे कळेल. अर्थात या व्हिडीओला त्यांनी कॅप्शनंच दिलंय की,'आईने केला माझा पोपट'(मॉं ने किया मेरा पोपट)

अनुपम खेर यांनी सिकंदरने लग्न केल्याची बातमी दिली तेव्हा दुलारी खेर बोलतात ,''अरे काय झालं लग्न केलं म्हणून. जग बदलतंय,आपणही बदलायला हवंय. मी तर खूप खुश आहे माझ्या नातवानं लग्न केलंय याबद्दल. खरंतर अनुपम यांना वाटलं होतं त्या अपसेट होतील. पण झालं उलटंच. खरंतर सिकंदर खेरने आपल्या शुटिंग निमित्तानं घातलेल्या दुल्हेराजाच्या ड्रेसवर काढलेला फोटो सहज अनुपम यांना पाठवला होता. त्या फोटोवरून त्यांनी आईसोबत प्रॅंक करायचं ठरवलं पण इथे त्यांचाच पोपट झाला. तेव्हा अनुपम म्हणाले,''ही जगातली सगळयात पुढारलेली आई आहे''.

Anupam Kher,SIkandar Kher,Dulari Kher

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT